गडचिरोली दि. २३जुलै :विदर्भ राज्य आदोलन समिती ची नियोजन व रुपरेषा बैठक गडचिरोली येथे स्थळ -शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड गडचिरोली येथे दिनांक २२-७-२०२६ ला बैठक संपन्न झाली. पत्रकार भवन गडचिरोली येथे पत्रकार परिषद संपन्न…
विदर्भ राज्य आदोलन समिती ची नियोजन व रुपरेषा बैठक गडचिरोली येथे स्थळ -शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड गडचिरोली येथे दिनांक २२-७-२०२६ ला बैठक संपन्न झाली. पत्रकार भवन गडचिरोली येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. याप्रसंगी विदर्भवादी नेते,पदाधिकारी व Oplus_16908288 कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. गडचिरोलीत पत्रकार परिषदेत उपस्थित श्री अॅड.वामनराव चटप माजी आमदार, श्री डाॅ.रमेश गजबे माजी मंत्री,श्री अरूण केदार, श्री मासुरकर,अॅड.चोखारे, अरूण पाटील मुनघाटे,अशोक पोरेड्डीवार, राजेंद्र सिंह ठाकूर, सुनील पोरेड्डीवार, प्रकाश ताकसांडे,चंद्रशेखर भडांगे,पवन गेडाम, नंदू कुमरे, गुरुदेव भोपये, राजू पाटील जक्कनवार,खुणेजी, केवलराम सालोटकर,मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.वेगळा विदर्भ राज्य आणी महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती.स्वतंत्र विदर्भ राज्याची व्यवहार्य मागणी, स्वतंत्र विदर्भ राज्य यासाठी रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 दुपारी बारा वाजता नागपूर येथील दीक्षाभूमी चे संविधान चौक पर्यंत विदर्भ निर्माण लॉन्ग मार्च व जाहीर सभा घेण्यात येणार आहे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले त्याचबरोबर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती बाबत मान्यवरांसह विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मत व्यक्त केले.