गडचिरोली टाइम्स दि.२५जुलै: नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टी कडून करण्यात आली होती.याच मुद्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते.
23 जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडलं.सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा अभिजीत दीपके यांनी केली होती.कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत होता. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थी ठाम होते.


कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला विरोधकांनी देखील पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या सर्व घडामोडीनंतर आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज (25 जुलै) राजीनामा दिला आहे.या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.गेल्या एका महिन्यांपासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे.
आज (25 जुलै) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं बोललं जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे.कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळालं.
कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्याच्या पार्श्वभूमीवर 24 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह यांच्यात जवळपास 2 तास बैठक झाली होती. या बैठकीत कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाकडून विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडण्यात आल्या होत्या. याच बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी दिली होती.या बैठकीत काय घडलं ? याची माहिती सांगताना अभिजीत दीपके यांनी थेट पंतप्रधान मोदींना इशारा दिला होता.
“ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझं आवाहन आहे की तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या,जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तुम्ही घेतला नाही,तर उद्या तुमची खुर्ची धोक्यात येईल ”, असा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला होता.


