गडचिरोली टाइम्स दि.१७ऑगष्ट :

स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन…मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा फडकवून बाईक रॅलीचा शुभारंभ
* तिरंगा बाईक रॅलीमध्ये सह-पालकमंत्री, आमदार, पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिका-यांचे सारथ्य- 300 हून अधिक पोलीस अधिकारी/अंमलदारांचा सहभाग
* पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक श्री. एम रमेश यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण
* स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य पदक, गुणवत्तापूर्ण सेवेसाठीपदक, वेगवर्धित पदोन्नती व उत्कृष्ट/अतिउत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांना कार्यक्रमप्रसंगी प्रशस्तिपत्र प्रदान…
* नवनिर्मित पोस्टे तुमरकोठी, पोमकें बिनागुंडा, बंगाडी व फुलणार येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकावून करण्यात आला स्वातंत्र्य दिन साजरा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून संपूर्ण भारत देशात आजचा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या शुरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांचे स्मरणही आजच्या दिवशी केले जाते. आज दिनांक 15/08/2026 रोजी 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम रमेश यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 20 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. महामहीम राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व 01 पोलीस अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहिर झाले होते. या कार्यक्रमाप्रसंगी पदक विजेत्यांचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक श्री. एम रमेश यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यासोबतच काल दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी गडचिरोली पोलीस दलातील वेगवर्धित पदोन्नती मिळालेले 06 तसेच उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदक प्राप्त 30 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. दिनांक 1 मे 2026 रोजी गडचिरोली पोलीस दलातील 425 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सी-60 सेवा पदक मा. पोलीस महासंचालक म. रा. यांच्या वतीने जाहिर करण्यात आले होते. त्याअनुषंगाने आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त 05 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रातिनिधिक स्वरुपात पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या हस्ते सी-60 सेवा पदक प्रदान करण्यात आले. यानंतर पोलीस अधीक्षक श्री. एम रमेश यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शहिद कुटूंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत ह
तिरंगा झेंडा फडकवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. सदर रॅलीसाठी गडचिरोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकायांसह एकूण 300 हून अधिक अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. पोलीस मुख्यालय, गडचिरोली ते इंदीरा गांधी चौकापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचे आयोजन देशसेवा तसेच शौर्य आणि त्यागाचा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. सदर रॅलीचे शुभारंभप्रसंगी, मा. आमदार गडचिरोली विधानसभा मतदार संघ श्री. मिलींद नरोटे, मा. जिल्हाधिकारी गडचिरोली श्री. अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली श्री. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. व सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे, उपविभागीय दंडाधिकारी गडचिरोली श्री. एम. अरुण यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होेते.
यासोबतच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांचे हस्ते तसेच पोलीस कल्याण अंतर्गत पोलीस संकुल येथील सरस्वती विद्यालय येथे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाला. यासोबतच नव्याने उभारलेल्या पोस्टे तुमरकोठी, पोमकें बिनागंुडा, बंगाडी व फुलणार याठिकाणी देखील पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील संपूर्ण पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे 80 वा स्वातंत्र्य दिन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मोठ¬ा उत्साहात साजरा करण्यात आला. दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा फडकवून बाईक रॅलीचा शुभारंभ
* तिरंगा बाईक रॅलीमध्ये सह-पालकमंत्री, आमदार, पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिका-यांचे सारथ्य- 300 हून अधिक पोलीस अधिकारी/अंमलदारांचा सहभाग
* पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक श्री. एम रमेश यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण
* स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य पदक, गुणवत्तापूर्ण सेवेसाठीपदक, वेगवर्धित पदोन्नती व उत्कृष्ट/अतिउत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांना कार्यक्रमप्रसंगी प्रशस्तिपत्र प्रदान
* नवनिर्मित पोस्टे तुमरकोठी, पोमकें बिनागुंडा, बंगाडी व फुलणार येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकावून करण्यात आला स्वातंत्र्य दिन साजरा
……………………………………………………………………………………………………………………………………………………..
15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून संपूर्ण भारत देशात आजचा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या शुरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांचे स्मरणही आजच्या दिवशी केले जाते. आज दिनांक 15/08/2026 रोजी 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम रमेश यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 20 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. महामहीम राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व 01 पोलीस अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहिर झाले होते. या कार्यक्रमाप्रसंगी पदक विजेत्यांचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक श्री. एम रमेश यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यासोबतच काल दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी गडचिरोली पोलीस दलातील वेगवर्धित पदोन्नती मिळालेले 06 तसेच उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदक प्राप्त 30 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. दिनांक 1 मे 2026 रोजी गडचिरोली पोलीस दलातील 425 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सी-60 सेवा पदक मा. पोलीस महासंचालक म. रा. यांच्या वतीने जाहिर करण्यात आले होते. त्याअनुषंगाने आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त 05 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रातिनिधिक स्वरुपात पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या हस्ते सी-60 सेवा पदक प्रदान करण्यात आले. यानंतर पोलीस अधीक्षक श्री. एम रमेश यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शहिद कुटूंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा फडकवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. सदर रॅलीसाठी गडचिरोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकायांसह एकूण 300 हून अधिक अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. पोलीस मुख्यालय, गडचिरोली ते इंदीरा गांधी चौकापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचे आयोजन देशसेवा तसेच शौर्य आणि त्यागाचा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. सदर रॅलीचे शुभारंभप्रसंगी, मा. आमदार गडचिरोली विधानसभा मतदार संघ श्री. मिलींद नरोटे, मा. जिल्हाधिकारी गडचिरोली श्री. अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली श्री. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. व सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे, उपविभागीय दंडाधिकारी गडचिरोली श्री. एम. अरुण यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होेते.
यासोबतच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांचे हस्ते तसेच पोलीस कल्याण अंतर्गत पोलीस संकुल येथील सरस्वती विद्यालय येथे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाला. यासोबतच नव्याने उभारलेल्या पोस्टे तुमरकोठी, पोमकें बिनागंुडा, बंगाडी व फुलणार याठिकाणी देखील पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील संपूर्ण पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे 80 वा स्वातंत्र्य दिन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मोठ¬ा उत्साहात साजरा करण्यात आला.