Saturday, September 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedविदर्भाची काशी मार्कंडा देवस्थान येथे प्रथमच वैनगंगेच्या तीरावर महागंगा पूजा-आरती...

विदर्भाची काशी मार्कंडा देवस्थान येथे प्रथमच वैनगंगेच्या तीरावर महागंगा पूजा-आरती…


विदर्भाची काशी मार्कंडा देवस्थान येथे प्रथमच वैनगंगेच्या तीरावर महागंगा पूजा-आरती…

*राज्यसभा खासदार मायाताई ईवनाते,जिल्हाधिकारी अविशांत पंडा,ह.भ.प.भागवताचार्य विनोदजी गोस्वामी महाराज, उपेंद्रजी कोठेकर,आमदार मोहन मते,माजी खासदार डॉ.अशोकजी नेते, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार डॉ. देवराव होळी,यांची विशेष उपस्थिती*

गडचिरोली टाइम्स दि. १८ऑगस्ट २०२६:

उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले आणि ‘विदर्भाची काशी’ म्हणून श्रद्धास्थान लाभलेले चामोर्शी तालुक्यातील प्राचीन ऐतिहासिक मार्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावणमासातील पहिल्याच सोमवारी प्रथमच ‘वैनगंगा नदीच्या तीरावर महागंगा पूजा-आरती’ भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभिनव धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महागंगा पूजा-आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.


यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी सर्वप्रथम मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मार्कंडेश्वर ऋषी देवाची विधिवत पूजा-अर्चना व आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर मंत्रोच्चारांच्या मंगलमय वातावरणात ‘ॐ नमः शिवाय’ तसेच महामृत्युंजय मंत्राचे पठण करण्यात आले.


शंखनाद, डमरूचा निनाद आणि हर हर महादेवच्या जयघोषात विधिवत गंगापूजन व महाआरती पार पडली. नदीच्या पवित्र प्रवाहासमोर दीपप्रज्वलन करत करण्यात आलेल्या या आरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पूजा-आरतीत सहभाग घेतला. **‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’**च्या जयघोषाने वैनगंगा तीर दुमदुमून गेला.

Oplus_16908288

या ऐतिहासिक महागंगा पूजा-आरती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे निकटवर्तीय सहाय्यक सुनीलजी मित्रा, अनिरुद्ध पालकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, नागपूरचे आमदार मोहनजी मते, जिल्हाधिकारी अविशयांत पंडा, जिल्हा अध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, गोविंद सारडा, प्रकाश गेडाम,संतोष भाऊ तंगडपल्लीवार, दिलीप चलाख,संजय बारापात्रे, चंद्रशेखर भडांगे,प्रकाश ताकसांडे,यश गण्यारपवार यांच्यासह मुरलीधर महाराज, नागपूरे महाराज व परिसरातील महाराज गण, तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते.

श्रावणाच्या पवित्र महिन्याच्या पहिल्याच सोमवारी वैनगंगेच्या तीरावर प्रथमच झालेल्या या महागंगा पूजा-आरतीमुळे मार्कंडा देवस्थानच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

या उपक्रमामुळे मार्कंडा देवस्थानचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होऊन वैनगंगा नदीच्या पावन तीराला नव्या आध्यात्मिक परंपरेची जोड मिळाली आहे.

Previous article
स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन…मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा फडकवून बाईक रॅलीचा शुभारंभ * तिरंगा बाईक रॅलीमध्ये सह-पालकमंत्री, आमदार, पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिका-यांचे सारथ्य- 300 हून अधिक पोलीस अधिकारी/अंमलदारांचा सहभाग * पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक श्री. एम रमेश यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण * स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य पदक, गुणवत्तापूर्ण सेवेसाठीपदक, वेगवर्धित पदोन्नती व उत्कृष्ट/अतिउत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांना कार्यक्रमप्रसंगी प्रशस्तिपत्र प्रदान * नवनिर्मित पोस्टे तुमरकोठी, पोमकें बिनागुंडा, बंगाडी व फुलणार येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकावून करण्यात आला स्वातंत्र्य दिन साजरा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून संपूर्ण भारत देशात आजचा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या शुरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांचे स्मरणही आजच्या दिवशी केले जाते. आज दिनांक 15/08/2026 रोजी 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम रमेश यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न…
Next article
*गडचिरोलीत विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारणीला मान्यता* *आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पाठपुराव्याला यश; कनेरी येथे उभारणार अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र* गडचिरोली, दि. १८ (जिमाका) : गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार, आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली तालुक्यातील कनेरी येथे विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करून मंत्रालयात बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात याबाबत बैठक झाली. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी मोठी क्षमता असून उपलब्ध जलसंपत्तीचा प्रभावी वापर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षणाची जोड देणे आवश्यक असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. स्थानिक मच्छीमार आणि युवकांना आधुनिक मत्स्यपालनाचे प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी प्रस्तावित केंद्राचे काम वेगाने मार्गी लावावे. त्यासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १ हजार ६४५ तलाव, २३ सिंचन तलाव, २ हजारांहून अधिक शेततळी तसेच अन्य वैयक्तिक जलस्रोत उपलब्ध आहेत. या जलस्रोतांमुळे जिल्ह्यात ६ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक जलक्षेत्र मत्स्यपालनासाठी उपलब्ध आहे. मात्र, बहुतांश मच्छीमारांकडून अद्याप पारंपरिक पद्धतीने मत्स्यव्यवसाय केला जात असल्याने मत्स्य उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्यविकास प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर कनेरी येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या अखत्यारितील २.८९ हेक्टर विनावापर जमीन मत्स्यव्यवसाय विभागाला उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या जागेवर विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रासोबत आधुनिक मत्स्यबीज केंद्र व आवश्यक अनुषंगिक सुविधा विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. जागा हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान तसेच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना यांचा जिल्ह्यातील मच्छीमार व मत्स्यकास्तकारांना अधिक प्रभावीपणे लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण केंद्र उपयुक्त ठरणार आहे. येथे आधुनिक मत्स्यपालन, मत्स्यबीज उत्पादन, मत्स्यखाद्य व्यवस्थापन, माती व पाणी परीक्षण, मत्स्यरोग निदान आणि मत्स्यप्रक्रिया याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. नागपूर येथे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण व सुविधा केंद्राचे काम मे २०२६ पासून सुरू आहे. त्यामुळे नागपूर येथे स्वतंत्र आणखी केंद्र उभारण्याऐवजी तेथील उपलब्ध सुविधांचा उपयोग करून आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात विभागीय प्रशिक्षण केंद्र विकसित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रस्तावित केंद्रात आधुनिक प्रशिक्षण सभागृह, ऑडिओ-व्हिज्युअल शिक्षण सुविधा, मत्स्यखाद्य व पोषण प्रयोगशाळा, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, शेतकरी मार्गदर्शन व सल्ला केंद्र, प्रशिक्षणार्थींसाठी वसतिगृह, माहिती व तांत्रिक साहित्य केंद्र, मत्स्यरोग निदान प्रयोगशाळा, पुनर्चक्रित जलसंवर्धन प्रणालीचे प्रात्यक्षिक केंद्र तसेच लघु मत्स्यप्रक्रिया केंद्र आदी सुविधा प्रस्तावित आहेत. या केंद्रामुळे गडचिरोली जिल्ह्यातील उपलब्ध जलसंपत्तीचा मत्स्य उत्पादनासाठी अधिक प्रभावी वापर होण्यास मदत होणार असून आधुनिक तंत्रज्ञान स्थानिक मच्छीमारांपर्यंत पोहोचणार आहे. त्याचबरोबर मत्स्य उत्पादन व मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे आणि स्थानिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ००००
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular