छत्रपती सेना जिल्हा गडचिरोली..छत्रपती सेनेचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वाढदिवसानिमित्य विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव…
*वाढदिवस शेकडो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत सेवाभाव दिन म्हणून साजरा…
*शेकडो नागरिकांना वस्त्रभेट, मौशिखांब मुरमाडी जिल्हापरिषद क्षेत्रात ५००० वृक्षाची वृक्षला
गवड..
*याप्रसंगी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते प्राचार्य मा.समशेर पठाण सर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष मा.रवींद्रभाऊ वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते मा.प्रकाशभाऊ ताकसांडे, काँग्रेस चे शहर अध्यक्ष नगर सेवक श्री. मा.सतीश विधाते, छत्रपती सेनेचे जिल्हाप्रमुख मा.यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, विनोद चापले, यादव चौधरी तथा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
*छत्रपती सेनेचे लढव्ये नेते तथा जनसेवा हाच मानवधर्म माणून गोरगरीबांच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारे व्यक्तीमत्व अरविंदभाऊ कात्रटवार यांचा वाढदिवस काल 23 जुलै रोजी सेवाभाव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो छत्रपती सैनिक, विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शेकडो नागरिकांना ‘वस्त्रभेट’ तसेच मौशिखांब मुरमाडी जिल्हापरिषद क्षेत्रात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरचे वनचरे’ या संकल्पनेतून वृक्षलागवडीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.*






*छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जोपासून अरविंदभाऊ कात्रटवार यांची वाटचाल सुरू आहे. कोणत्याही पदाची लालसा न बाळगता जनतेचा सेवक म्हणून गरजवंतांच्या मदतीला धावून जाणे व निराधारांना आधार देणे, नागरिकांच्या अडअडची सोडविणे, गावागावात जाऊन तेथील समस्या जाणून घेऊन शासन व प्रशासन दरबारी समस्यांचा पाठपुरावा करणे, समस्या सोडविण्यास भाग पाडणे असे अनेक कार्य अरविंदभाऊ कात्रटवार करीत आहेत. सेवाभावाने केलेले कार्य आणि त्यापासून मिळणारा आनंद हा अनमोल असतो, हेच ‘ब्रिद’ जोपासून त्यांची वाटचाल सुरू आहे.*
*अरविंदभाऊ कात्रटवार यांनी छत्रपती सैनिकांना आपले कुटुंब मानून छत्रपती सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना संकट काळात आधार देण्याचे कार्य करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर असोत अथवा शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी असोत प्रत्येक गरजवंतांच्या मदतीसाठी सेवाभाव जोपासून आधार देण्याचे काम अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केल्याची भावना छत्रपती सैनिकांनी व्यक्त केली.*
**याप्रसंगी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते प्राचार्य मा.समशेर पठाण सर, राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष मा.रविंद्रभाऊ वासेकर, राष्ट्रवादी कॉग्रेस (शप गट) पक्षाचे नेते मा.प्रकाशभाऊ ताकसांडे, काँग्रेस चे शहर अध्यक्ष नगर सेवक श्री. मा.सतीश विधाते, मा.यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, विनोद चापले, यादव चौधरी, शाम झोडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोंगरकर, जगण चापले, यादव चौधरी, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, नक्टू कलसर, राहुल ठाकरे, भूषण ठाकरे, शुभम समर्थ, प्रवीण म्हस्के, अजय संदोकर, विजय मत्ते, बालाजी चापले, भवन चापले, पूनम झंझाळ, निखिल कुढवे, विकी वाडणकर, विकास ठाकरे, राहुल ठाकरे, साहिल कोहपरे, रोहित चणेकार, चैतन्य मेश्राम, ढिसू ढवळे, लक्ष्मण चौधरी, राजेंद्र ढवळे, दुर्योधन भैसारे, सुधाकर ढवळे, भूषण गुरुकार, महेश खेडेकर, चंद्रशेखर पेंदाम, सुनील कोसमशिले, मनोहर कोसनशिले, दीपक कोसनशिले, प्रशांत मडावी, मंगल भरणे, मोहित, अनुज कुमिटी, प्रकाश भजभुजे, सूरज वाघाडे, रुपेश ठाकरे, मोहित पेंदाम, जितेंद्र वाघमारे, समीर ठाकरे छत्रपती सैनिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.


