Wednesday, July 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि.२५जुलै:गडचिरोलीत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; SIR व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या...

गडचिरोली टाइम्स दि.२५जुलै:गडचिरोलीत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; SIR व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या नियोजनावर सखोल मंथन… माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी जिल्हा प्रभारी तथा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या मार्गदर्शनात बैठक संपन्न…

गडचिरोली टाइम्स दि.२५जुलै:गडचिरोलीत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; SIR व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या नियोजनावर सखोल मंथन…
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी जिल्हा प्रभारी तथा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या मार्गदर्शनात बैठक संपन्न…

गडचिरोली येथील माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज शुक्रवारी SIR (Special Intensive Revision) अभियान आणि आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहात पार पडली.

ही बैठक चिमुर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी मान. श्री. बंटीभाऊ ऊर्फ किर्तीकुमार भांगडीया यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रमुख मार्गदर्शनातील उपस्थितीत संपन्न झाली.

बैठकीपूर्वी गडचिरोली आगमनाने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे डॉ. अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्नेहपूर्वक स्वागत व सत्कार करण्यात आले.

बैठकीत आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणूक, SIR अंतर्गत मतदार यादी विशेष पुनरिक्षण, नवीन मतदार नोंदणी, मतदार याद्यांतील दुरुस्ती, पात्र मतदारांची नोंद सुनिश्चित करणे तसेच संघटनात्मक बळकटीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बूथ स्तरापर्यंत पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, पदवीधर मतदारांपर्यंत प्रभावी संपर्क मोहीम राबविणे, प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करण्याची गरज तसेच आगामी निवडणुकांसाठी सूक्ष्म नियोजन याबाबत आमदार बंटीभाऊ भांगडीया आणि डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून आवश्यक रणनीती निश्चित केली.

यावेळी बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रांत तेली समाज अध्यक्ष प्रमोद पिपरे, शहराध्यक्ष तथा नगरपरिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, डॉ. चंदाताई कोडवते, चिमुर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर,भाजप युवा नेते आशिष देवतळे, सभापती आवेश पठाण, भाजप नेते डॉ. भारत खटी, नगरपरिषद उपाध्यक्ष निखिल चरडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, कामगार आघाडी प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, ज्येष्ठ नेते गजानन येनगंदलवार, जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षा शेडमाके, धानोरा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, जिल्हा सचिव सारंग साळवे तसेच अनिल पोहनकर, अनिल तिडके, भामरागडचे तपेश हलदार, अर्जुन आलाम यांच्यासह भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचा समारोप आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणूक तसेच SIR अभियान यशस्वी करण्यासाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करत प्रत्येक बूथपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular