Wednesday, July 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. १२ जुलै २०२६:_गडचिरोलीत लगत मेंढा येथील हत्तीच्या हल्ल्यात धनराज...

गडचिरोली टाइम्स दि. १२ जुलै २०२६:_गडचिरोलीत लगत मेंढा येथील हत्तीच्या हल्ल्यात धनराज मडावी या शेतकऱ्यांचा मृत्यू; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घेतली कुटुंबीयांची सांत्वन भेट…

*_गडचिरोलीत लगत मेंढा येथील हत्तीच्या हल्ल्यात धनराज मडावी या शेतकऱ्यांचा मृत्यू; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घेतली कुटुंबीयांची सांत्वन भेट, तातडीच्या मदतीचे वनविभागाला निर्देश!_*गडचिरोली शहराजवळील बोदली मेंढा येथील धनराज मनिराम मडावी (वय ३५ वर्ष) असे मृत शेतकऱ्याचा हत्तीच्या कळपाने जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनेचा थरार: शेतीसाठी खत आणायला गेला आणि मिळालेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास धनराज मडावी हे शेतीसाठी खत आणण्याकरिता गेले होते. दरम्यान, परिसरात ठाण मांडून असलेल्या हत्तीच्या कळपाने त्यांना गाठले. हत्तीने त्यांचा पाठलाग केला आणि एका मोठ्या हत्तीने सोंडेने चिरडून त्यांना जागीच ठार केले.

*मा.खा.डॉ. अशोक नेते यांच्याकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन आणि आर्थिक मदत*
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी आज बोदली मेंढा गावाला भेट दिली. त्यांनी मृत धनराज मडावी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत सुपूर्द केली.

“मडावी कुटुंबावर कोसळलेला हा आघात अत्यंत मोठा आहे. आम्ही या कठीण काळात पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. — डॉ. अशोक नेते (माजी खासदार)
*शेतीचे नुकसान आणि गोदामाची नासधूस: प्रत्यक्ष पाहणी*
यानंतर माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन हत्तीच्या कळपाने केलेल्या नुकसानीची पाहणी केली. हत्तींनी धान पिकांचे टाकलेले पडे पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. तसेच, येथील व्यापारी दिलीप बुरले यांच्या धान्याच्या गोदामाचे शटर तोडून आत ठेवलेल्या धान्याची आणि गोदामाची मोठी नासधूस हत्तींनी केली आहे.

*मुख्य वनसंरक्षकांशी दूरध्वनीवरून चर्चा: तात्काळ पंचनाम्याचे आदेश*
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घटनास्थळावरूनच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक (CCF) गजेंद्र नरवाणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मडावी कुटुंबाला तात्काळ सानुग्रह मदत देण्याची आणि हत्तींनी केलेल्या शेतपिकांच्या व गोदामाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची कडक सूचना त्यांनी वनविभागाला दिली.
*गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा आणि महत्त्वाच्या सूचना*
हत्तींचा वावर पाहता डॉ. अशोकजी नेते यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत पुढीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन केले: एकटे जंगलात जाऊ नका: जंगलात किंवा शेतात काम करताना नागरिकांनी एकटे जाणे टाळावे.
* गटाने वावरा: हत्तींचा कळप आसपास असल्याने नेहमी ४-५ लोकांनी मिळूनच बाहेर पडावे.
* सतर्क राहा: हत्तीचा कोणताही सुगावा लागल्यास तात्काळ इतर गावकऱ्यांना आणि वनविभागाला माहिती द्या.या प्रसंगी या सांत्वनपर भेटीदरम्यान प्रामुख्याने डॉ. अशोकजी नेते यांच्यासोबत भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास पा.भांडेकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधाकर जी पेटकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा धान्य व्यापारी दिलीप बुरले,भाजपा माजी तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, पो.पा.प्रमोद साखरे,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रविंद्र बुरले,दिवाकर पिपरे,प्रकाश निकुरे (धान्य व्यापारी) संभाजी ठाकरे, राकेश राचमलवार आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक जनता उपस्थित होते.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular