
*अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ*(कार्यक्षेत्र- संपूर्ण भारत)पत्रकार संघाचे सन्माननीय सर्व पदाधिकारी व सभासदांकरिता १जुलै २०२६ आनंदाचा व महत्त्वाचा दिवस ठरलेला आहे.
भारत सरकार सहकार, वित्त व वाणिज्य मंत्रालयाकडून संघटनेला
१) *INCOMETAX*,
२) *GOV. OF INDIA MCA,*
३) *ISO,*
४) *MAHANGO DEVELOPMENT ASSOCIATION*
हे ४ महत्त्वाचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
सर्व केंद्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांनी संघटनेचा विस्तार करण्याकरीता सहकार्य करावे .
१) जुन्या सभासदांचे ओळखपत्र नूतनीकरण करावे.
२) सर्वांना विमा लागू याबाबत माहिती द्यावी.
३) नवीन पत्रकार सभासद संख्या वाढवावी.
४) संघटनेमार्फत जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर दरमहा महिन्याचे शेवटचे तारखेला सभा घ्यावी .व त्याचे अहवाल केंद्राला पाठवावे .
५) संघटनेमार्फत नवनवीन उपक्रम राबवावे व त्याबाबतचे वृत्तपत्र कात्रण व फाईल जिल्हा व तालुकास्तरावर ठेवावी.
६) पत्रकार मागण्या संदर्भात लवकरच आंदोलन भुमिका ठरविण्यात येणार आहे .
७) प्रत्येक केंद्रीय पदाधिकारी नी कार्य करावे .
सर्वांना याबाबत कळविण्यात यावे.
*मनोहर सुने*
(राष्ट्रीय अध्यक्ष)
*युसुफखान पठाण*
( राष्ट्रीय कार्याध्यक्ष)
*सुरेश सवळे*
(अध्यक्ष, राष्ट्रीय नियोजन समीती)
**कैलासबापू देशमुख*
(राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)
*राजेंद्र भुरे*
( राष्ट्रीय सरचिटणीस)


