Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. १८ सप्टेंबर २०२६ : शिवणीजवळ एसटी बसचा भीषण अपघात;...

गडचिरोली टाइम्स दि. १८ सप्टेंबर २०२६ : शिवणीजवळ एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटी* *३८ प्रवासी जखमी; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची तातडीने रुग्णालयात धाव घेत जखमींची केली विचारपूस*

शिवणीजवळ एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटी*
*३८ प्रवासी जखमी; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची तातडीने रुग्णालयात धाव घेत जखमींची केली विचारपूस*
गडचिरोली–चामोर्शी महामार्गावर शिवणी गावाजवळ आज शुक्रवारी दुपारी प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. MH 06 BW 8848 क्रमांकाची ही बस गडचिरोलीहून चामोर्शीकडे जात असताना प्राथमिक माहितीनुसार बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर पलटी झाली.
गडचिरोली शहरापासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर शिवणी गावाजवळ हा अपघात घडला. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी असल्याने अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. चालकाने बसवरील नियंत्रण मिळवून अपघात टाळण्याचा प्रयत्न केला; मात्र स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे बस अनियंत्रित होऊन पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

*जखमींची माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घेतली आस्थेने विचारपूस*

अपघाताची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी तत्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी अपघातातील जखमी रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली तसेच त्यांना धीर दिला.

यावेळी डॉ. नेते यांनी रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थेची पाहणी करून जखमींवर तातडीने व योग्य पद्धतीने उपचार मिळत आहेत का, याची माहिती घेतली. आवश्यक वैद्यकीय उपचारांबाबत संबंधित डॉक्टरांशी त्यांनी चर्चा केली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे, डॉ. मनिष मेश्राम, डॉ. मनोहर मडावी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच जखमी प्रवाशांचे नातेवाईक उपस्थित होते.

दरम्यान, अपघातातील सर्व जखमींवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रशासन व आरोग्य विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular