Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि.२०ऑगष्ट गडचिरोली शहरातील "हर हर महादेवच्या जयघोषात: कावड यात्रेत...

गडचिरोली टाइम्स दि.२०ऑगष्ट गडचिरोली शहरातील “हर हर महादेवच्या जयघोषात: कावड यात्रेत माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी सहभागी… सुंदरकांड मंडळ व मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. श्रावण महिन्याच्या पवित्र मुहूर्तावर दुर्गा मंदिरापासून या यात्रेला प्रारंभ झाला.

Oplus_16908288
गडचिरोली टाइम्स दि.२०ऑगष्ट:गडचिरोली शहरातील “हर हर महादेवच्या जयघोषात: कावड यात्रेत माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी सहभागी…
सुंदरकांड मंडळ व मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. श्रावण महिन्याच्या पवित्र मुहूर्तावर दुर्गा मंदिरापासून या यात्रेला प्रारंभ झाला.

यात्रेच्या प्रारंभी दुर्गा मातेची पूजा व विधिवत आरती करण्यात आली. यानंतर “हर हर महादेव” च्या घोषणांसह हजारो भाविकांसह कावड यात्रा मार्गस्थ झाली.

या यात्रेत *गडचिरोली विधानसभेचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी* यांनी उपस्थित राहून खांद्यावर कावड घेत पदयात्रेत सहभाग घेतला.

Oplus_16908288

गेल्या *9 वर्षांपासून* अखंडितपणे सुरू असलेली ही परंपरा यंदाही तितक्याच श्रद्धेने पार पडली. गडचिरोलीतील दुर्गा मंदिर येथून सुरू झालेली ही पदयात्रा मार्कंडादेव मंदिरावर जाऊन समाप्त होणार आहे. तेथे कावडीतील पवित्र जलाने भगवान शंकराचा अभिषेक करून भजन व महाआरतीने यात्रेची सांगता होईल.

या धार्मिक सोहळ्याला शहरातील मान्यवर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष भाविक उपस्थित होते. संपूर्ण मार्गावर ग्रामस्थांनी फुलांची उधळण करून यात्रेकरूंचे स्वागत केले.

Previous article
Next article
गडचिरोली टाइम्स दि. २२ ऑगस्ट २०२६ : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाला आता आणखी मोठे वळण मिळाले आहे. गडचिरोली न्यायालयाने आश्रमशाळेचे संचालक तथा माजी खासदार मारोतराव कोवासे आणि त्यांचे सुपुत्र, संस्थेचे सचिव व गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत कोवासे या पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप आणि प्रशासनावर वाढलेला दबाव यामुळे जपतलाई आश्रमशाळेच्या कारभाराची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. अतिरिक्त प्रकल्प अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून आश्रमशाळेशी संबंधित पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये संस्था अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, त्यांचे सुपुत्र व संस्थेचे सचिव अॅड. विश्वजीत कोवासे, मुख्याध्यापक, पुरुष अधीक्षक आणि महिला अधीक्षक यांचा समावेश आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular