Wednesday, July 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. १८जुलै :गडचिरोली जिल्ह्यात बांबू लावण्यासंदर्भात मुंबई येथे बैठक पार...

गडचिरोली टाइम्स दि. १८जुलै :गडचिरोली जिल्ह्यात बांबू लावण्यासंदर्भात मुंबई येथे बैठक पार पडली.* माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची उपस्थिती.

गडचिरोली जिल्ह्यात बांबू लावण्यासंदर्भात मुंबई येथे बैठक पार पडली.माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची उपस्थिती.
महाराष्ट्र इंस्टिट्यूशन फॉर ट्रांसफॉर्मेशन (MITRA) चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीणसिह परदेशी व आशिआई विकास बँक (ADB) यांच्या मार्फतीने एमआयडीसी कार्यालय एक्सप्रेस टावर मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस विविध विभागांचे सचिव, कुलगुरू, एफपीओचे प्रतिनिधी, महाराष्ट्र बांबू फाउंडेशनचे पदाधिकारी, मुख्य वनसंरक्षक, तसेच बांबू क्षेत्रात कार्यरत विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात बांबू क्षेत्रात कार्य करणारे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनाही विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

या बैठकीमध्ये खालील मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. केंद्र व महाराष्ट्र शासन मा मुख्यमंत्री यांच ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहेत. या लागवडीसाठी एडीबीआय बँकेतून कर्ज स्वरूपात निधी द्यायचा असल्याने या निधीच्या माध्यमातून कोण कोणते नियोजन करायचे या संदर्भात चर्चा करण्यात आली.

शेतकरी व्यक्तिक एफपीओ ग्रामसभा हे मोठ्या प्रमाणात स्वतःच्या शेतीवर किवा वनहक्क दाव्याने मिळालेल्या सामुहिक जागेवर मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करू शकतात. बांबू लागवडीसाठी मनरेगा अंतर्गत एक हेक्टर साठीतीन वर्षासाठी ७ लाख ४०००/- चे अनुदान मिळतो. या योजनेअंतर्गत बांबू लागवड करायचे असल्यास शेतकरी एफपीओ व ग्रामसभा सदस्यांनी स्थानिक कृषी सहायकाच्या वतीने लागवड नियोजन आराखडा तयार करावा.

येणाऱ्या काळात बांबूला शाश्वत खरेदीदार मिळावा म्हणून ADBI बँकेमार्फत वैयक्तिक सामूहिक एफपीओ ना बांबूवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या उद्योगात टिशू कल्चर द्वारे रोप तयार करणे, बांबूवर संशोधन व रोपवाटीकेद्वारे शेतकऱ्यापर्यंत रोप पुरवण्याची साखळी तयार करणे, बांबूपासून फ्लोरिंग टाईल्स, फर्निचर अगरबती काळ्या, टुथपिक, ब्रश, बांबू चमच, बांबू कोळसा, बांबू पिलेट्स, बांबू ब्रिकेट्स, बांबू पासून इथेनॉल निर्मित असे विविध उद्योग उभारण्यात येतील.

या उद्योगासाठी २.५ करोड ते १००० करोड पर्यंत भांडवल आशियन डेवलपमेंट बँक (ADB) कडून उपलब्ध होणार आहे. यामधे जवळपास वेगवेगळ्या भांडवली खर्चावर ५० ते ६० टक्क्यांपर्यंत अनुदान प्राप्त होणार आहे.

यामुळे बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी १.५ ते २ लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. बांबू लागवड केल्यानंतर तीन वर्ष योग्य जोपासना केल्यास चौथ्या वर्षापासून सलग कुठल्याही लागवडीसाठी खर्च न करता ४० ते ५० वर्ष उत्पन्न मिळत राहणार.

तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय स्थरावरून कार्बन क्रेडिटच्या रूपाने सुद्धा उत्पन्न मिळत राहणार आहे. कारण बांबू हे गवत वर्गीय वनस्पती असून चार वर्षात परिपक्व होतो व इतर कोणत्याही झाडापेक्षा ३०% ओसिजन सोडतो, व वातावरणातील ३०% CO2 शोषून घेतो त्यामुळे बांबू हे वातावरणातील संतुलित ठेवणार वनस्पती असून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या क्षेत्रात बांबू लागवड करण्याची सुवर्णसंधी आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना , एफपीओ , ग्रामसभाना बांबू लागवड करायची असल्यास माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांच्याशी संपर्क साधावा. व गडचिरोली जिल्ह्याचा शाश्वत विकासासाठी सहकार्य करावे.

या बैठकीला महाराष्ट्र इंस्टिट्यूशन फॉर ट्रांसफॉर्मेशन संचालक प्रवीण परदेशी, एडीबी चे समन्वयक राहुल देशमुख, डायरेक्टर MACC फॉरेस्ट्री पुणे संदीप येंग, संतोष कुलकर्णी, मित्रा संयोजक राजश्री विश्वास राव, डॉ परसराम पाटील, केदार पवार, वनविभाग सचिव, ग्रामविकास पंचायत राज उद्योग विकास आयुक्त आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular