Wednesday, July 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि.१६जुलै:भाजप जिल्हा बैठकीत संघटन बळकटी, SIR मोहीम व सेवाभावी उपक्रमांवर...

गडचिरोली टाइम्स दि.१६जुलै:भाजप जिल्हा बैठकीत संघटन बळकटी, SIR मोहीम व सेवाभावी उपक्रमांवर भर.. गडचिरोली जिल्हा बैठकीत माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा उपक्रम राबविण्याचे आवाहन…

गडचिरोली टाइम्स दि.१६जुलै:भाजप जिल्हा बैठकीत संघटन बळकटी, SIR मोहीम व सेवाभावी उपक्रमांवर भर..
गडचिरोली जिल्हा बैठकीत माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा उपक्रम राबविण्याचे आवाहन…
भारतीय जनता पक्षाची जिल्हा बैठक आज (बुधवार, दि. १५ जुलै) दुपारी २.०० वाजता आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्यकक्ष जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
बैठकीला माजी खासदार अशोकजी नेते,भाजप जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी,माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम व गोविंद सारडा, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, शहराध्यक्ष तथा नगरपरिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, तालुका अध्यक्ष दत्तू सुत्रपवार, तसेच लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, विविध मोर्चांचे जिल्हाध्यक्ष, महामंत्री, कोअर समिती सदस्य व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी प्रास्ताविकातून विशेष मतदार पुनरावलोकन (SIR) अभियान, पदवीधर मतदार नोंदणी, नुकत्याच जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या निर्णयाची माहिती, तसेच २२ जुलै रोजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर राबविण्यात येणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. संघटनात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी भाजप संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने बूथस्तरावर सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. विशेषतः SIR अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने संबंधित बीएलओसोबत प्रत्यक्ष गावात जाऊन मतदार पडताळणीचे काम करावे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

तसेच २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, रुग्णसेवा, स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूंना मदत अशा विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. नेते यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाचे प्रत्येक बूथवर सामूहिक श्रवण आयोजित करून केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. संघटना हीच भाजपाची खरी ताकद असून प्रत्येक कार्यकर्त्याने समाजाशी सातत्याने संपर्क ठेवत पक्षाचे विचार आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवावीत, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रम, बूथ सक्षमीकरण, सदस्य नोंदणी, जनसंपर्क अभियान तसेच विविध राजकीय व सामाजिक उपक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनेच्या बळकटीसाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीचे संचालन जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांनी केले. बैठकीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.बैठकीच्या शेवटी भाजप किसान मोर्चा चे जिल्हा महामंत्री तथा जेष्ठ नेते बंडुजी झाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी सुभेच्छा दिल्या…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular