गडचिरोलीचे रामनगर निवासी आनंदकुमार तुळशीराम खंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नागपूर शहर यांची कन्या कु. आम्रपाली आनंदकुमार खंडारे हीने न्यूयॉर्क विद्यापीठ, अमेरिका येथून सन 2024 ते सन 2026 या कालावधीत पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून तीला ‘ मास्टर्स इन मेक्याट्रॉनिक्स अँड रोबोटिक्स प्रोग्राम ‘ ही पदवी प्रदान करण्यात आली. तिचे प्राथमिक शिक्षण
– नर्सरी, जुनिअर केजी, सिनिअर केजी, तसेच इयत्ता 1 ली ते SSC (CBSC) पर्यंत कारमेल हायस्कुल, गडचिरोली येथे झाले, तिने SSC सीबीएससी बोर्ड परीक्षा सन 2015 मध्ये 93.01 % गुण घेतले व त्यानंतर इयत्ता 11 वी व 12 वी पर्यंत शिक्षण सेंट पॉल जुनिअर सायन्स कॉलेज, नागपूर येथून घेतले असून तिने HSC(12 वी ) परीक्षा सन 2017 मध्ये 88% गुण घेतले आहेत. त्यानंतर तिने जिद्द व चिकाटीने अभ्यास करून JEE परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त करून विश्वेशरय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर (VNIT) नागपूर येथे प्रवेश मिळवून ‘इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ‘ मध्ये B. Tech पदवी चे शिक्षण पूर्ण करून सोबतच रोबोटिक्स टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट चे सुद्धा प्रशिक्षण प्राप्त केले. त्यानंतर बेंगलोर (कर्नाटक ) येथे एका रोबोटिक्स टेकनॉलॉजी कंपनीत नोकरी करीत असतांनाच पुढील अभ्यास सुरु ठेवून परदेशात शिक्षण घेण्याकरिता दयावी लागणारी पात्रता परीक्षा – GRE व टॉफेल परीक्षेमध्ये अभ्यासात सातत्य ठेवून कठोर मेहनत घेऊन 340 पैकी 310 गुण घेऊन उत्तमरित्या परीक्षेत यश मिळविल्याने तिची अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात निवड होऊन अतिशय संघर्ष करून तिने ‘ मास्टर्स इन मेक्याट्रॉनिक्स अँड रोबोटिक्स प्रोग्राम ‘ ही पदवी संपादन केली आहे, दि. 18/05/26 रोजी न्यूयॉर्क विद्यापीठात झालेल्या दीक्षांत सोहळ्यात तीला ही पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना दिले आहे.


