दिनांक २८एप्रिल २०२६रोजी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवनाथ कुंभारे साहेब यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले.धन्वंतरी मल्टिस्पेशालिटी सेंटर गडचिरोली चे संस्थापक सुप्रसिद्ध डॉ. शिवनाथ कुंभारे साहेब यांनी गडचिरोली या आदिवासी अतिदुर्गम नक्षलग्रस्त जिल्ह्यात ५०वर्षापेक्षा अधिक काळ आरोग्य सेवा दिली.गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा गडचिरोली च्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार करणारे ज्येष्ठ समाजसेवक, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती राळेगण सिद्धी चे विश्वस्त,गुरुदेव व्यायाम प्रसारक मंडळ गडचिरोली चे संस्थापक अध्यक्ष, गडचिरोली जिल्हा निर्मिती आंदोलनात सक्रिय सहभाग,, गडचिरोली जिल्हा दारूबंदी कार्यात तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक कार्यात त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे.
दिनांक २८एप्रिल २०२६रोजी सायंकाळी ६.४५वाजता मोक्षधाम गडचिरोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी सर्च शोधग्राम चे संस्थापक डॉ. अभय बंग, डॉ.राणी बंग, अमृत बंग,गडचिरोली विधानसभा सभा मतदार संघाचे आमदडॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदारहिरामणजी वरखडे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, ज्येष्ठ समाजसेवक चंदू पाटील मारकवार, सुबोध दादा अड्याळटेकडी,गुरुकुंज मोझरीचे सेवाधिकारी,सुरेश सावकार पोरेड्डीवार,अरविंद पाटील वासेकर, डॉ.फारुखी, डॉ. अनिल रुडे,डॉ.अरुण राठोड साहेब,डॉ. चलाख साहेब,रविंद्र वासेकर,डॉ. अनंत शिवनाथजी कुंभारे,वर्षाताई कुंभारे,ऍड.संदिप धाईत, राजूभाऊ कात्रटवार,अरुणभाऊ निंबोरकर,अनिल पाटील म्हशाखेत्री,घनश्यामजी मडावी,अरविंद कात्रटवार,रामायणजी खटी, गुलाब मडावी,प्रमोद वैद्य, गोवर्धन चव्हाण, कामडी सर,भारत खटी, प्रकाश ताकसांडे यांचे सह मोठ्या संख्येने उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, गुरुदेव भक्त,नातेवाईक व पत्रकार उपस्थित होते.