Friday, September 25, 2026
Google search engine

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने प्रोजेक्ट उडान अंतर्गत “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन; अतिदुर्गम भागातील सुशिक्षित युवक-युवतींसाठी राबविण्यात आला अभुतपूर्व उपक्रम

* मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा अॅड. श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते युवक-युवतींना नियुक्तीपत्रांचे वितरण

* रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांकडून एकूण 1278 नियुक्तीपत्र प्रदान

* मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा अॅड. श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते माओवादी विरोधी अभियान पेट्रोलिंग करीता प्राप्त 31 चारचाकी वाहनांचे लोकार्पण

गडचिरोली पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमूळे गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद जवळजवळ संपूष्टात आला असून जिल्ह्रातील नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गतच गरजु युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्रातील बेरोजगार युवक-युवतींकरीता आज दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन पोलीस मुख्यायल परिसरातील शहीद पांडू आलाम सभागृह येथे करण्यात आले.

या रोजगार मेळाव्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, फ्लिपकार्ट, डी-मार्ट, लॉयड्स अँड मेटल्स एनर्जी लिमीटेड सारख्या नामांकित कंपनींसह एकूण 38 कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. या रोजगार मेळाव्यामध्ये दुर्गम-अतिदुर्गम भागातील विविध प्रकारच्या रोजगाराचा लाभ घेण्यासाठी 4000 पेक्षा अधिक बेरोजगार युवक-युवती तसेच गडचिरोली पोलीस दलात कार्यरत अधिकारी व अंमलदार यांचे पाल्य यांनी देखील नोंदणी केली होती. यापैकी जवळपास एकूण 2400 उमेदवार प्रत्यक्ष रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते. यामधून आज पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये 367, हिटाची (जळगाव) कंपनीमध्ये 134, फ्लीपकार्ट व डीमार्ट कंपनीमध्ये 120, टोयोटा-किर्लोस्कर कंपनीमध्ये 30 यासारख्या नामांकित कंपन्यांच्या वतीने एकूण 1278 नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहेत. सदर विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांना 1 लाख 80 हजार ते 3 लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे. आयोजित कार्यक्रमादरम्यान मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते निवड झालेल्या युवक-युवतींना नियुक्ती प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा अॅड. श्री. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, “सर्व युवक युवतींनी मिळालेल्या संधीचा स्विकार करुन अतिशय प्रामाणिकपणे काम करायचे आहे. तसेच मिळालेल्या अनुभवाचा सदुपयोग करुन चांगल्या भविष्यासाठी नेहमीच प्रयत्नशिल राहायचे आहे. स्पर्धेच्या युगामध्ये सर्व युवक-युवतींनी स्वत:मध्ये बदल घडवून स्पर्धेसाठी सक्षम बनावे.” यासोबतच विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे त्यांनी कौतुक केले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या यशस्वी रोजगार मेळाव्याच्या आयोजनाबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन केले.

आतापर्यंत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध नागरी कृती उपक्रमांतर्गत रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत सुरक्षा रक्षक 877, नर्सिंग असिस्टंट 1292, हॉस्पीटॅलीटी 398, ऑटोमोबाईल 377, इलेक्ट्रीशिअन 313, प्लंम्बींग 35, वेल्डींग 370, जनरल डयुटी असिस्टंट 403, फिल्ड ऑफीसर 11, व्हीएलई 52, सेल्समॅन 5, वेब डेव्हलपर 90, टीव्ही असेंब्ली ऑपरेटर 110 सॉफ्टवेअर डेव्हलपर 120, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 2543 व किसान मोटर्स 155 टाटा मोटर मेकॅनिक 29 अशा प्रकारचे विविध रोजगार जिल्ह्रातील युवक-युवतींना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

यासोबतच पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर माओवाद विरोधी अभियान पेट्रोलिंग करीता प्राप्त वाहनांचा लोकार्पण सोहळा मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा अॅड. श्री. आशिष जयस्वाल यांच्या शुभहस्ते व आणि इतर मान्यवर, वरिष्ठ अधिका­यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून पार पडला. यामध्ये एकूण 31 चारचाकी वाहनांचा समावेश असून त्यात 03 अत्याधूनिक सव्र्हेलियंस व्हॅनचा देखील समावेश आहे.

सदर रोजगार मेळाव्याप्रसंगी मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा अॅड. श्री. आशिष जयस्वाल, आमदार गडचिरोली विधानसभा मतदार संघ डॉ. श्री. मिलींद नरोटे, जिल्हाधिकारी गडचिरोली श्री. अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली श्री. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, संचालक ग्रा. वि. व उद्योजकता यशवंतराव चव्हाण म. मुक्त विद्यापीठ  प्रा. श्री. कैलास मोरे, संचालक , युवाशक्ती फाऊंडेशन, पुणे श्री. एकनाथ पवार हे उपस्थित होते.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous article
गडचिरोली टाइम्स दि. १५एप्रिल : जनकापूर तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त बौद्ध समाज मंडळ जनकापूर यांच्या कडुन भीम जयंती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .ज्ञानाचा अथांग महासागर,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, अर्थतज्ज्ञ, विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखंड परिश्रम आणि त्यांची ज्ञानसाधना जगात सर्वश्रेष्ठ होती. त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगात ओळखल्या जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून प्रत्येकानी शिक्षणाची कास धरावी.बाबासाहेबांचा एक तरी गुण आत्मसात करुन त्याची अविरत कृतीशील जोपासना करणे आवश्यक असल्याचे मत प्रकाश ताकसांडे यांनी व्यक्त केले.
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular