Monday, May 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. १५एप्रिल : जनकापूर तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे डॉ....

गडचिरोली टाइम्स दि. १५एप्रिल : जनकापूर तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त बौद्ध समाज मंडळ जनकापूर यांच्या कडुन भीम जयंती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .ज्ञानाचा अथांग महासागर,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, अर्थतज्ज्ञ, विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखंड परिश्रम आणि त्यांची ज्ञानसाधना जगात सर्वश्रेष्ठ होती. त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगात ओळखल्या जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून प्रत्येकानी शिक्षणाची कास धरावी.बाबासाहेबांचा एक तरी गुण आत्मसात करुन त्याची अविरत कृतीशील जोपासना करणे आवश्यक असल्याचे मत प्रकाश ताकसांडे यांनी व्यक्त केले.

गडचिरोली टाइम्स दि. १५एप्रिल : जनकापूर तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त बौद्ध समाज मंडळ जनकापूर यांच्या कडुन भीम जयंती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,महामानव विश्वरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ज्ञानाचा अथांग महासागर,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, अर्थतज्ज्ञ, विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखंड परिश्रम आणि त्यांची ज्ञानसाधना जगात सर्वश्रेष्ठ होती. त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगात ओळखल्या जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून प्रत्येकानी बाबासाहेबांचा एक तरी गुण आत्मसात करुन त्याची अविरत कृतीशील जोपासना करणे आवश्यक असल्याचे मत प्रकाश ताकसांडे यांनी व्यक्त केले,याप्रसंगी बौद्ध समाजाचे अध्यक्ष वालदेजी,ब्रम्हदास धुर्वे,सुरेश धुर्वे,कालिदास उंदीरवाडे,शैलेश उंदीरवाडे, जनकापूर येथील प्रतिष्टीत नागरिक, माता, भगिनी, युवक, युवती, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular