आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आदिवासी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी आदिवासी समाजातील आजी-माजी खासदार आमदार लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत विचारमंथनाची दिशा ठरविण्याकरिता हॉटेल जिंजर,गडचिरोली येथे २० सप्टेंबर २०२६रोजी डॉ. मिलिंद नरोटे यांच्या संकल्पनेतून चिंतन बैठक आयोजित करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर पक्षविरहित विचारमंथनातून ठोस दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने माझ्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मागील जून महिन्यात झालेल्या पहिल्या बैठकीचा आढावा घेऊन, त्यावेळी मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर झालेली कार्यवाही, प्रलंबित विषय आणि पुढील काळात करावयाच्या पाठपुराव्याबाबत सविस्तर चर्चा केली.






जमीन व वनहक्क, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामसभेचे अधिकार, शिक्षण, आरोग्य, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व वसतिगृहांच्या समस्या, गोंडी भाषेचे संवर्धन, उच्च शिक्षण, युवकांचे प्रश्न आणि व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर समाजबांधवांनी आपली मते व सूचना मांडल्या.
माझी भूमिका स्पष्ट आहे समाजाचे प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता, त्यांची जबाबदारी निश्चित करून अंमलबजावणीपर्यंत सातत्याने पाठपुरावा झाला पाहिजे. समाजाने प्रश्न, सूचना आणि मार्गदर्शन द्यावे; ते प्रश्न शासनदरबारी मांडून सोडविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील विविध संघटना, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधत ही विचारमंथनाची प्रक्रिया पुढे नेण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. 


यावेळी भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, आदिवासी नेते देवाजी तोफा, माजी आमदार आनंदरावजी गेडाम, भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष नितीनजी कोडवते, नगरसेविका तथा भाजपा जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, ऑल इंडिया फेडरेशन जिल्हाध्यक्ष सदानंदजी ताराम, गोटूल समितीचे नंदुजी नरोटे, शिवसेना उबाटा जिल्हाध्यक्ष पवनजी गेडाम, समाज कल्याण आयुक्त सचिनजी मडावी, पुष्पलताताई कुमरे,सौ.वैशालीताई मिलिंद नरोटे यांचेसह आदिवासी समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.


