Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. २१ऑगष्ट:वाढदिवसाचा जल्लोष टाळून मवेली येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

गडचिरोली टाइम्स दि. २१ऑगष्ट:वाढदिवसाचा जल्लोष टाळून मवेली येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; इंजिनिअर जान्हवी चन्नावार यांचा समाजोपयोगी उपक्रम… सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार यांच्या कन्या इंजिनिअर जान्हवी प्रविण चन्नावार यांच्या वाढदिवसानिमित्त मवेली येथील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच खाऊचे वितरण करण्यात आले.

गडचिरोली टाइम्स दि. २१ऑगष्ट:वाढदिवसाचा जल्लोष टाळून मवेली येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; इंजिनिअर जान्हवी चन्नावार यांचा समाजोपयोगी उपक्रम…
सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार यांच्या कन्या इंजिनिअर जान्हवी प्रविण चन्नावार यांच्या वाढदिवसानिमित्त मवेली येथील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच खाऊचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात माजी पंचायत समिती सभापती केशव पुडो ,पोलिस पाटील शिवाजी मठामी,लालाजी मठामी , मनोज मतामी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जोगेंदर कुजूर,मनीष टोपो,आकाश मतामी, सोमेश्वर येलपुलवार, अंगणवाडी सेविका निता येलपुलवार,सुपारवायजर दुर्वा मॅडम,आरोग्यसेविका संगीता उसेंडी,आरोग्यसेवक राणा,सुरज मतामी,रविंद्र मतामी,संदीप कुजूर व असंख्य नागरिक व महिला उपस्थित होते.

Oplus_16908288
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च न करता तोच पैसा समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करण्याचा उपक्रम यंदाही राबविण्यात आला.
आजच्या काळात वाढदिवस म्हटला की मोठा खर्च, केक, पार्ट्या आणि जल्लोष करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, ‘आपण समाजाचे काही देणे लागतो’ या सामाजिक जाणिवेतून जान्हवी चन्नावार यांनी आपल्या वाढदिवसाला वेगळे स्वरूप देत गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि गरजूंच्या मदतीची भावना अधोरेखित झाली आहे.
दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत करण्याचा संकल्प चन्नावार कुटुंबीयांकडून केला जातो. याच सामाजिक दायित्वाच्या भावनेतून यावर्षीही शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उपयोगाचे साहित्य देण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.
शिक्षण हेच गरिबी आणि सामाजिक विषमता दूर करण्याचे प्रभावी माध्यम आहे, या विचारातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्यास त्यांच्या शिक्षणाला निश्चितच हातभार लागतो. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील चमक हीच या उपक्रमाची खरी कमाई असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःसाठी खर्च करण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करून इंजिनिअर जान्हवी चन्नावार यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
समाजातील इतरांनीही वाढदिवस, जयंती अथवा अन्य आनंदाचे प्रसंग केवळ व्यक्तिगत उत्सव न ठेवता गरजू, गरीब व वंचित घटकांच्या मदतीसाठी वापरल्यास सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत होऊ शकते. जान्हवी चन्नावार यांच्या या उपक्रमातून ‘आनंद स्वतःपुरता न ठेवता तो इतरांसोबत वाटला, तर त्याचे समाधान अनेकपटीने वाढते’ असा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल पुडो ने केले. तर संचालन व आभार प्रदर्शन संजय मटामी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल मतामी, जनी घीसू मटटामी, करिष्मा मतामी, माधुरी मतामी व अन्य लोकांनी सहकार्य केले.

Previous article
गडचिरोली टाइम्स दि. २२ ऑगस्ट २०२६ : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाला आता आणखी मोठे वळण मिळाले आहे. गडचिरोली न्यायालयाने आश्रमशाळेचे संचालक तथा माजी खासदार मारोतराव कोवासे आणि त्यांचे सुपुत्र, संस्थेचे सचिव व गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत कोवासे या पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप आणि प्रशासनावर वाढलेला दबाव यामुळे जपतलाई आश्रमशाळेच्या कारभाराची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. अतिरिक्त प्रकल्प अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून आश्रमशाळेशी संबंधित पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये संस्था अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, त्यांचे सुपुत्र व संस्थेचे सचिव अॅड. विश्वजीत कोवासे, मुख्याध्यापक, पुरुष अधीक्षक आणि महिला अधीक्षक यांचा समावेश आहे.
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular