


महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा महोत्सव २०२६ अंतर्गत गडचिरोली शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
“वृक्षो रक्षति रक्षितः” या संस्कृत उक्तीप्रमाणे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित, स्वच्छ आणि समृद्ध भविष्यासाठी वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला. हा उपक्रम निसर्ग संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करणारा ठरला.
यावेळी नगराध्यक्षा अॅड. प्रणोती निंबोरकर, न.प. बांधकाम सभापती तथा भाजपा शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, न.प. उपाध्यक्ष निखिलजी चरडे, नगरसेविका साक्षीताई बोलूवार, नगरसेवक केशवजी मडावी, सागरजी सोनटक्के, वाढईजी, आकाशजी बोलूवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


