विकासाभिमुख , दूरदृष्टी, विकास आणि जनतेच्या विश्वासाचे नेतृत्व…
_’देवाभाऊ’ म्हणून जनमानसात स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा अभिष्टचिंतन_
२२ जुलै हा महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू, विकासाभिमुख आणि जनतेशी सातत्याने संवाद साधणाऱ्या नेतृत्वाचा वाढदिवस आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी आपल्या कार्यशैली, निर्णयक्षमता आणि विकासाच्या व्यापक दृष्टीकोनातून राज्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थी चळवळीतून सुरू झालेला त्यांचा सार्वजनिक जीवनाचा प्रवास महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री या सर्वोच्च जबाबदारीपर्यंत पोहोचला असून प्रत्येक टप्प्यावर त्यांनी लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी रस्ते, द्रुतगती महामार्ग, मेट्रो, सिंचन, जलसंधारण, उद्योग, गुंतवणूक, डिजिटल प्रशासन, कृषी, शिक्षण, आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांत व्यापक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राने आधुनिक, गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे.

मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शासनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य दिले. नागरिकांना शासकीय सेवा घरबसल्या उपलब्ध व्हाव्यात, महसूल सेवा ऑनलाइन व्हाव्यात, जमिनीच्या नोंदींचे संगणकीकरण व्हावे आणि प्रशासनातील अनावश्यक विलंब कमी व्हावा, यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला.
त्यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागात राबविण्यात आलेल्या सुधारणांमुळे भूसंपादन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळबद्ध झाली. विकास प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांच्या हितांचे संरक्षण, योग्य मोबदला आणि पुनर्वसनाला महत्त्व देण्यात आले. याच धोरणामुळे गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पासारख्या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती मिळाली. विदर्भातील लाखो हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरला.
राज्याच्या विकासाचा मैलाचा दगड ठरलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा त्यांच्या दूरदृष्टीचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. मुंबई ते नागपूर हा प्रवास अधिक वेगवान झाल्याने उद्योग, व्यापार, कृषी प्रक्रिया, पर्यटन आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळाली. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी ऊर्जा मिळाली.
गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासातही त्यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण प्रगती झाली.
सुरजागड लोहखनिज प्रकल्प, कोनसरी स्टील प्रकल्प आणि इतर औद्योगिक गुंतवणुकींमुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. रस्ते, पूल, वीज, दळणवळण आणि मूलभूत सुविधांच्या विकासामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडू लागला आहे.
कृषी क्षेत्रालाही त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष प्राधान्य देण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला असून शेतीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न झाला आहे. सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावरही शासनाने भर दिला आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील सामाजिक परिवर्तनाची महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला असून त्यांच्या स्वाभिमानाला नवी ताकद मिळाली आहे. महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे राज्यभरातील अनेक महिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रेमाने “देवाभाऊ” या नावाने संबोधतात. शासन जनतेच्या दारी आणि महिलांच्या सन्मानासाठी कटिबद्ध असल्याची भावना या योजनेमुळे अधिक दृढ झाली आहे.
त्यांची अभ्यासू वृत्ती, प्रभावी वक्तृत्व, तर्कशुद्ध निर्णयक्षमता, विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन आणि सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ यांमुळे ते महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. राज्याच्या प्रगतीसोबतच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत महत्त्वाचा ठरला आहे.
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना त्यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड जनसेवेची ऊर्जा लाभो. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक सक्षम, समृद्ध, सुरक्षित, आधुनिक आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने वाटचाल करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
*– दिवाकर रामदास गेडाम*
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख गडचिरोली.


