Wednesday, July 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. १९जुलै :गांधीवादी विचारसरणीच्या सप्तर्षी सरांकडून मला बरेच काही शिकता...

गडचिरोली टाइम्स दि. १९जुलै :गांधीवादी विचारसरणीच्या सप्तर्षी सरांकडून मला बरेच काही शिकता आले.-ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे

Oplus_16908288
:कॉलेज जीवनात विविध सामाजिक उपक्रम चवळीत काम करताना डॉ कुमार सप्तर्षी सरांशी संपर्क आला त्यांच्यासोबत काही वेळ जवळून काम करता आलं. पुण्यातही अनेक कार्यक्रमात त्यांनी आवर्जून पाठवलेल्या आग्रही निमंत्रण कार्यक्रमात सहभागी होता आलं. त्यांच्या एका सामाजिक बांधिलकीच्या व चळवळीच्या युवा युनिटचा मला सदस्य देखील होता आलं हे माझे भाग्य त्यांनी आवर्जून पाठवलेली पुस्तके व पत्रे अजूनही आठवणीतील संग्रहित आहेत. एका गांधीवादी विचारसरणीच्या कुमार सप्तर्षी सरांकडून मला बरेच काही शिकता आले. काही वेळेस राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन राज्य कार्यालयीन बैठकीतही अधून मधून भेटी व्हायच्या त्यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी होते. मला अजूनही आठवते चंद्रपूरच्या एका जिल्हा परिषद सभागृहातील सामाजिक कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून आले होते. मला त्या प्रसंगी त्यांनी आवर्जून फोन केला व बोलावून घेतले हे त्यांचं अगदी साधेपण मी जवळून अनुभवलं एका प्रगल्भ अथांग विचारसरणीच्या व चळवळीच्या व्यक्तीची सर्व सामान्य कार्यकर्ता व मातीशी नाळ जुळून असलेल्या तळागाळापर्यंत कशी बांधिलकी असते हे मी अनुभवलं असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
भावपूर्ण श्रद्धांजली…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular