Wednesday, July 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. १८जुलै : सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, समन्वयक, कोअर कमिटी मेंबर्स,...

गडचिरोली टाइम्स दि. १८जुलै : सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, समन्वयक, कोअर कमिटी मेंबर्स, पदाधिकारी व सदस्यांना सूचित करण्यात येते उपरोक्त प्रमाणे आपापल्या जिल्ह्यात आयोजीत *जिल्हा बैठक व पत्रकार परिषद* यांची माहिती आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांपर्यंत प्रसारीत करून जनजागर अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.

*जय विदर्भ! जय जय विदर्भ!
विदर्भ राज्य आंदोलन समिती*
*पूर्व विदर्भ जनजागर अभियान*
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष *ॲड. वामनराव चटप, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार , पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. प्रा. पी. आर. राजपूत, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनील चोखारे , कोअर कमिटी मेंबर डॉ. रमेशकुमार गजबे, प्रा. पद्माताई राजपूत* यांचे पूर्व विदर्भ जनजागर अभियान पुढीलप्रमाणे आयोजीत करण्यात आले आहे.
बुधवार, *दिनांक : २२ जुलै २०२६*
*गडचिरोली* : १२.०० : *जिल्हा बैठक*
सायंकाळी : ४.०० : *पत्रकार परिषद*

संपर्क :- *अरुणभाऊ मुनघाटे पाटील*
(समन्वयक गडचिरोली जिल्हा)
मो : 9423121445

*राजेंद्र सिंग ठाकूर*
अध्यक्ष उत्तर गडचिरोली जिल्हा
मो : 7588727632

*अशोक पोराड्डीवार*
अध्यक्ष दक्षिण गडचिरोली जिल्हा
मो :- 8080029605

*प्रमुख विषय*
१. *विनम्र श्रद्धांजली*
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा स्मृतीशेष *श्रीमती रंजनाताई मामर्डे आणि विधान परिषद सदस्य शिक्षक नेते प्रा. बी. टी. देशमुख* यांना विनम्र श्रद्धांजली.
२. *विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा : सिंदखेड राजा* दिनांक २५ जुलै २०२६ : पूर्वतयारी.
३. *क्रांती दिन : लाँग मार्च* दीक्षाभूमी ते संविधान चौक, नागपूर. दिनांक ९ऑगस्ट २०२६.
४. *८ सप्टेंबर २०२६* रोजी अहेरी येथे होणाऱ्या “विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा” च्या पूर्व तयारी बाबत चर्चा.
५. संघटनात्मक बांधणी व कोअर कमिटी मेंबर वाढविण्याबाबत चर्चा.
६. अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय.
****

सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, समन्वयक, कोअर कमिटी मेंबर्स, पदाधिकारी व सदस्यांना सूचित करण्यात येते उपरोक्त प्रमाणे आपापल्या जिल्ह्यात आयोजीत *जिल्हा बैठक व पत्रकार परिषद* यांची माहिती आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांपर्यंत प्रसारीत करून जनजागर अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.
असे आवाहन अरुणभाऊ केदार
अध्यक्ष, पूर्व विदर्भ,विदर्भ राज्य आंदोलन समिती यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular