Saturday, September 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. १३जुलै :गोंडवाना विद्यापीठात भारतीय शिक्षा दिवस या विषयावर एकदिवसीय...

गडचिरोली टाइम्स दि. १३जुलै :गोंडवाना विद्यापीठात भारतीय शिक्षा दिवस या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न..

गोंडवाना विद्यापीठात भारतीय शिक्षा दिवस या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय शिक्षा दिवस’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा गोंडवाना विद्यापीठात नुकतीच पार पडली . कार्यशाळेला प्रमुख साधन व्यक्ती म्हणून विदर्भ प्रांत संयोजक, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास तथा विभागप्रमुख, हिंदी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर डॉ. मनोज पांडे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक भौतिकशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. अपर्णा भाके उपस्थित होत्या .
कार्यशाळेत डॉ. मनोज पांडे यांनी भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge Systems – IKS), शिक्षणातील भारतीय मूल्यांची भूमिका, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, संशोधनाची गुणवत्ता तसेच विद्यार्थीकेंद्रित मातृभाषेतून शिक्षण यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले . शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, संशोधनाभिमुख आणि समाजोपयोगी करण्यासाठी शिक्षक, संशोधक आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी शिक्षा संस्कृती उत्थान न्यास चे कार्य, उद्दिष्टे आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान याविषयी माहिती त्यांनी दिली . भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या दृष्टीने अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. ही कार्यशाळा कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यशाळेचे संचालन सहा . प्रा . डॉ. प्रशांत ठाकरे तर आभार धेर्यशील खामकर यांनी मानले . कार्यशाळेस विद्यापीठातील प्राध्यापक , अधिकारी वर्ग आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular