Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. २० सप्टेंबर २०२६ : सिंदेवाहीत भाजप महिला आघाडीच्या वतीने...

गडचिरोली टाइम्स दि. २० सप्टेंबर २०२६ : सिंदेवाहीत भाजप महिला आघाडीच्या वतीने भव्य रक्षाबंधन कार्यक्रम..माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती; महिलांच्या सक्षमीकरणाचा दिला संदेश…


गडचिरोली टाइम्स दि. २० सप्टेंबर २०२६ : सिंदेवाहीत भाजप महिला आघाडीच्या वतीने भव्य रक्षाबंधन कार्यक्रम..माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती; महिलांच्या सक्षमीकरणाचा दिला संदेश…
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, तालुका सिंदेवाही यांच्या वतीने सिंदेवाही येथील सर्वोदय विद्यालयाच्या भव्य पटांगणात रक्षाबंधन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना डॉ. अशोकजी नेते यांनी महिलांच्या वाढत्या सहभागाचे आणि योगदानाचे कौतुक केले. महिलांना पुढे राजकीय क्षेत्रात ३३ टक्के आरक्षण मिळणार असून, महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाहीत, असे प्रतिपादन त्यांनी केले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक तसेच विविध क्षेत्रांत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला असून, महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी समाजाने सदैव सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.


यावेळी चिमूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ ऊर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांनी महिलांप्रती आपली भूमिका व्यक्त करताना सांगितले की, “महिला भगिनींच्या पाठीशी भाऊ म्हणून मी सदैव उभा राहीन. महिलांचे दुःख मी जवळून पाहिले आहे. मी राजकारण करत नाही, मात्र महिला भगिनींच्या सुख-दुःखात सदैव त्यांच्या सोबत राहणे, ही माझी भूमिका आहे.” त्यांच्या या भावनिक भूमिकेला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला माजी आमदार अविनाशजी वारजूरकर, कार्यक्रमाचे आयोजक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहितभाऊ बोम्मावार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णाभाऊ सहारे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा ज्येष्ठ नेते राजू पा. बोरकर, भाजपा सिंदेवाही तालुका अध्यक्ष नागराज गेडाम, चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा छायाताई घाडगे, हितेश सुचक, अरविंद राऊत, गणवीर सर, कमलाकर सिद्दमशेटीवार, बालू पिसे, रितेश अलमस्त यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून महिला भगिनींनी डाँ.अशोकजी नेते ,बंटीभाऊ भांगडिया, व अविनाशभाऊ/सतिशभाऊ वारजूरकर ह्या भावंडाना राखी बांधुन भाऊ-बहिणीचा स्नेह प्रेम पाहायला मिळाला.

भाऊ-बहिणीच्या प्रेम, स्नेह आणि विश्वासाच्या नात्यासोबतच महिला सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular