Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाईम्स दिनांक १८ सप्टेंबर:गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी भव्य...

गडचिरोली टाईम्स दिनांक १८ सप्टेंबर:गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन सन 2005 पासूनच्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा नाविण्यपुर्ण उपक्रम • पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्डसह पुनर्वसन निधी धनादेशाचे वितरण …………


गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन
सन 2005 पासूनच्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा नाविण्यपुर्ण उपक्रम
• पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्डसह पुनर्वसन निधी धनादेशाचे वितरण
• यासोबतच उपस्थित आत्मसमर्पितांची वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी


गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद संपुष्टात आला असून, नागरिक आता माओवादाच्या दहशतीतून मुक्त झाले आहेत. हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होणा­या या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा सर्वंकष विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल होणे सुसह्र व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सातत्याने वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आत्मसमर्पित माओवादी सदस्यांकरीता दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे तसेच आज दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस उप-मुख्यालय, (प्राणहिता) अहेरी येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

सविस्तर वृत असे आहे की, आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामूळे आजपर्यंत एकूण 819 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली व प्राणहिता या दोन्ही ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच पूर्वी आत्मसमर्पण केलेल्या माओवादी सदस्यांच्या प्रलंबित समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासोबतच, शासनाच्या विविध पुनर्वसन योजना व उपलब्ध सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सदर जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच सदर मेळाव्यादरम्यान आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, महा सारथी कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड काढून त्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी गडचिरोली व अहेरी येथे आयोजित मेळाव्यामध्ये आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येऊन एकूण 313 लाभाथ्र्यांचे विविध शासकीय योजनांचे दाखले काढून देण्यात आले आहेत. यासोबतच तज्ञ वैद्यकीय पथकाकडून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून या पुनर्वसन कालावधीत केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राबवता आत्मसमर्पित सदस्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या आरोग्य व शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष देण्यात आले. ऑपरेशन रोशनी अतंर्गत नेत्रोपचार शिबीरे व नसबंदी री-ओपनिंग सारख्या आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि सामाजिक समावेशन, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ध्यान, योग, शिबीरे आयोजीत करण्यात आले. तसेच प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करुन 46 आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे विवाह लाऊन देण्यात आले. 96 आत्मसमर्पित माओवादी यांना लॉयेड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटेड कंपनीत कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
आयोजित मेळाव्यात पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, ¬‘गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत विविध प्रकारची मदत देण्यात आली आहे. आत्मसमर्पित सदस्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करुन आत्मनिर्भर बनावे, कुटंुबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पूढे जावे, तसेच आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबध्द आहे.’

सदर मेळाव्याप्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. हर्षवर्धन बी. जे., सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे, सहा. पोलीस अधीक्षक, भामरागड श्री. सागर भामरे, सहा. पोलीस अधीक्षक, धानोरा श्री. सुयश कुमार सिंग व पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. सुनिल उईके, उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा श्री. समाधान पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा श्री. राहुल मडावी, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी श्री. हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. नरेंद्र पिवाल, पोउपनि. विक्रम बुरंगे, मपोउपनि. प्रतिक्षा राठोड व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular