गडचिरोली टाइम्स दि.२२जुलै:मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत विविध सेवाभावी उपक्रम संपन्न..माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने वृद्धाश्रमात अन्नदान, फळे वाटप व वृक्षारोपण; यासोबतच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयात रक्तदान शिबिर व भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने महिलांना शिलाई मशिनच्या वाटपाचे आयोजन….
महाराष्ट्राचे लोकप्रिय, विकासाभिमुख मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मान. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या पुढाकारातून व नेतृत्वात गडचिरोली शहरात विविध सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मान. रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा समाजहित जपणारे, गरजूंच्या सेवेसाठी समर्पित आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारे उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने गडचिरोली येथेही सामाजिक दायित्व जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
*सेवाभावी उपक्रमांची प्रमुख वैशिष्ट्ये:*
* रक्तदान शिबिर: गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन.
*महिलांच्या सक्षमीकरणासाठी व महिलांना स्वावलंबी होण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहुन कुटुंबाला हातभार लागावा यासाठी शिलाई मशिन वाटप..
* फळे व अन्नदान वाटप: महिला व बाल शासकीय रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करून फळे वाटप.
* ‘एक घास माणुसकीचा’: रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान उपक्रम.
* वृद्धाश्रमात संवाद व मदत: मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे (कीट) वाटप.
* पर्यावरण संवर्धन: वृद्धाश्रम परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण.
*गडचिरोली शहरातील विशेष कार्यक्रम*
२२ जुलै रोजी सकाळी मातोश्री वृद्धाश्रम, गडचिरोली येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व त्यांना अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. या अन्नदान कीटमध्ये तांदूळ, गहु, डाळ, खाद्यतेल, मीठ, तिखट यांसारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
यानंतर महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच ‘एक घास माणुसकीचा’ या उपक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.
तसेच, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या जनसंपर्क कर्तव्य कक्ष कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
यासोबतच महिला भगिनींनी सक्षम व आत्मनिर्भर व्हाव्यात तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी व महिलांना स्वावलंबी होण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहुन कुटुंबाला हातभार लागावा यासाठी नगर परिषद नगरभवन येथे शिलाई मशिन वाटप करण्यात आले.
“समाजसेवा हाच वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग” – डॉ. अशोकजी नेते
वृद्धाश्रमात अन्नधान्य कीट वाटप करताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले “ज्येष्ठ नागरिकांसोबत अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करून आनंदोत्सव साजरा करणे ही अत्यंत आनंददायी बाब असून हे आपले सामाजिक दायित्व आहे. मी १ जुलैला माझ्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा येथे येऊन वृद्धांना साहित्य दिले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आणि युतीचे सरकार असतानाच्या काळापासून हे वृद्धाश्रम कार्यरत आहे. वृद्धांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना मदत करणे हीच खरी सेवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या पुढील कार्यास सुख, समृद्धी, आनंद व उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना!”
ते पुढे म्हणाले, “वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजसेवा. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हाच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी सर्वात मोठा आनंदोत्सव ठरेल.” त्यांनी सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना आपापल्या परिसरात अशाच लोकहितवादी व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी प्रामुख्याने आमदार डॉ. मिलिंद जी नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, नगराध्यक्षा अँड. प्रणोती सागर निंबोरकर, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, कि.मो. प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीनजी कोडवते, बांधकाम सभापती नगर परिषद तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर,जेष्ठ नेते डॉ. भारत खटी, महिला व बालकल्याण सभापती नगर परिषद तथा शहराध्यक्षा सीमा कन्नमवार, तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार.
*आघाडी व मोर्चा पदाधिकारी:*
भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, कामगार आघाडी प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष विलास भांडेकर, माजी जिल्हा परिषद सभापती रंजिता कोडापे, जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षा शेडमाके.
*नगरसेवक व शहर पदाधिकारी*: नगरसेविका अर्चना निंबोळ, नगरसेविका ज्ञानेश्वरी धंदरे, नगरसेविका गुुड्डी मारभते, नगरसेविका शिल्पा गव्हारे, साक्षी बोलूवार, शहर महामंत्री विनोद देवोजवार, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री सलिम शेख, अनिल पोहनकर, जेष्ठ नेते गजानन येंगदलवार.
*इतर प्रमुख उपस्थिती:* डाँ.माधुरी किलनाके,मातोश्री वृद्धाश्रमाचे अधीक्षक गंगाधर चंदावार, बंडू झाडे, अविनाश विश्रोजवार, संजयजी बारापात्रे, दतु माकोडे, सुभल मिस्त्री,घनश्याम वाढई, प्रशांत अल्लमपटलावार,कान्हुजी लोहबरे, पल्लवी बारापात्रे, किर्ती मासुरकर, गणेश दहेलकर, लोमेश कोलते, जनार्दन साखरे, देवाजी लाटकर, दिनेश नवघडे यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


