गडचिरोली टाइम्स दि.२०जूलै : डॉ. कन्ना मडावी यांचा सहपत्नीक गौरव; संविधान उद्देशिकेचे वाटप, आदिवासी डॉक्टरांची ऐतिहासिक एकजूट गडचिरोली ट्रायबल डॉक्टर असोसिएशनच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेला डॉक्टर डे सोहळा आणि ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. कन्ना मडावी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.आर. के. सेलिब्रेशन हॉल, 
कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, चंद्रपूर GMC चे व्हाइस डीन डॉ. गजेंद्र सुरपाम, डॉ. दिपचंद सोयाम, डॉ. पुरुषोत्तम मडावी, सीआरपीएफ कमांडंट डॉ. वसंत कुमरे, डॉ. मिलिंदकुमार कुमरे आणि डॉ. छाया उईके यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतील मोठ्या संख्येने आदिवासी डॉक्टर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते डॉ. कन्ना मडावी व त्यांच्या पत्नीचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आलेला सहपत्नीक सत्कार. यावेळी डॉ. होळी यांनी डॉ. मडावी यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित वैद्यकीय सेवेचा गौरव करत त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे विशेष कौतुक केले.
याशिवाय, मंचावरील सर्व मान्यवरांना डायरी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व डॉक्टरांना भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देत त्यांचाही गौरव करण्यात आला. संविधान मूल्यांचा प्रसार करणारा हा उपक्रम कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.
आपल्या मनोगतात डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी समाजातील डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. गडचिरोली ट्रायबल डॉक्टर असोसिएशनच्या या पहिल्या उपक्रमामुळे आदिवासी डॉक्टरांना भविष्यात एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. सचिन मडावी, डॉ. सुनील मडावी, डॉ. चेतन कोवे, डॉ. नितीन मसराम, डॉ. उमेश सिडाम, डॉ. प्रियंका शेडमाके, डॉ. सोनल कोवे, डॉ. माधुरी किलनाके, डॉ. प्रवीण किलनाके, डॉ. तारकेश्वर उईके व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले. उपस्थितांनी या अभिनव आणि ऐतिहासिक उपक्रमाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


