गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 5,98,300/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा व उपपोस्टे रेपनपल्ली पोलीसांची संयुक्त कारवाई…
गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 19 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा व उपपोस्टे रेपनपल्ली येथील पोलीस पथकाने सापळा रचून अवैद्य देशी-विदेशी दारूची वाहतूक व विक्री करणाया आरोपींविरुध्द कारवाई केलेली आहे.

सविस्तर वृत असे आहे की, काल दिनांक 19 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली पोलीसांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इसम नामे संदिप गुराल्ला व त्याचा साथीदार सुरेंदर भुक्या हे पांढया रंगाच्या फोर्ड कंपनिच्या ईको स्पोट्र्स या चारचाकी वाहनाने उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील चिल्लर दारु विक्रेत्यांना विदेशी दारुचा पुरवठा करणार आहेत. अशा मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व उपपोस्टे रेपनपल्ली येथील पोलीस पथकाने मौजा रेपनपल्ली येथे सापळा रचला असता, मिळालेल्या माहितीप्रमाणे पांढया रंगाची फोर्ड कंपनीची ईको स्पोट्र्स चारचाकी वाहन क्र. डी. एल. 2 एफ.बी.पी. 0045 वाहन संशयास्पदरित्या येताना दिसून आली. यावरून पोलीस पथकाने रस्त्यात तात्पुरता अडथळा निर्माण करून वाहन चालकास हात दाखवून थंाबण्याचा ईशारा केला. यानंतर वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजुला थांबविल्यानंतर पोलीसांनी वाहन चालक व त्याच्या बाजुला बसलेल्या इसमास त्यांचे नाव व गाव विचारले असता, त्यांनी आपले नाव 1) सुरेंदर शंकर भुक्या (नायक), वय 38 वर्षे, रा. सुभाषनगर, नसपूर ता. जि. मंचेरीअल (तेलंगाणा), 2) संदीप स्वामी गुराल्ला, वय 31 वर्षे, रा. करमपल्ली, ता. चेन्नुर, जि. मंचेरीअल (तेलंगाणा) असे सांगितले.
यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, सदर चारचाकी वाहनामध्ये 1) 08 नग खडर्¬ाच्या खोक्यात 750 एम. एल. मापाच्या ऑफीसर्स चॉईस विस्की कंपनीचे 89 नग प्लास्टीक बाटल्या एकूण किंमत अंदाजे 89,000/- रुपये, 2) 03 नग खडर्¬ाच्या खोक्यात 750 एम. एल. मापाच्या किंगफिशर स्ट्राँग कंपनीचे 31 नग काचेच्या बाटल्या एकूण किंमत अंदाजे 9,300/- रुपये व 3) अवैध दारुची वाहतूक करण्याकरीता वापरण्यात आलेली एक पांढया रंगाची फोर्ड कंपनीची ईको स्पोट्र्स चार वाहन क्रमांक डी. एल. 2 एफ.बी.पी. 0045 किंमत अंदाजे 5,00,000/- रुपये असा एकूण 5,98,300/- रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेला आहे. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने उपपोस्टे रेपनपल्ली येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 36/2026 कलम 65 (अ), 83 म.दा.का. अन्वये आरोपी नामे 1) सुरेंदर शंकर भुक्या (नायक), वय 38 वर्षे, रा. सुभाषनगर, नसपूर ता. जि. मंचेरीअल (तेलंगाणा), 2) संदीप स्वामी गुराल्ला, वय 31 वर्षे, रा. करमपल्ली, ता. चेन्नुर, जि. मंचेरीअल (तेलंगाणा) यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. हर्षवर्धन बी. जे., उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व उपपोस्टे रेपनपल्ली येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.


