*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामांची भेट घेऊन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा*लेह (लडाख)येथे दिनांक ६जुलै २०२६रोजी – जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज लडाख येथील लेह येथे पूज्य धम्मगुरू दलाई लामा यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. लेह येथे पूज्य बौद्धधम्मगुरू लामा यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित आयोजित जाहीर कार्यक्रमात ना. रामदास आठवले उपस्थित होते.यावेळी झालेल्या बौद्ध धम्म वंदनेत ना. रामदास आठवले सहभागी झाले. यावेळी पूज्य दलाई लामा यांनी आपण १३० वर्षे जगणार असल्याचे जाहीर सांगितले.त्यांना असे दीर्घ निरोगी आयुष्य लाभो या शुभेच्छा ना. रामदास आठवले यांनी दिल्या.पूज्य धम्मगुरू दलाई लामा हे दरवर्षी ६ जुलै ला त्यांचा वाढदिवस सोहळा लेह मध्ये साजरा करतात. लेह मध्ये जुलै आणि ऑगस्ट दोन महिने ते लेह मध्ये वास्तव्याला असतात.त्यांच्या वाढदिवसानिमित हिमाचल ;तिबेट ; लडाख मधील हजारो बौद्ध अनुयायी तसेच देशभरातील बौद्ध अनुयायी पूज्य दलाई लामांच्या वाढदिवस सोहळ्यास ६जुलै रोजी लेह येथे गर्दी करतात.आज लेह येथे पूज्य जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या वाढदिवस सोहळ्यास ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले. त्यांना पूज्य दलाई लामा यांनी पवित्र तिबेटी धम्म शाल उपरणे घालून ना.रामदास आठवले यांना आशीर्वाद दिले. या वाढदिवस सोहळ्यास ना.रामदास आठवले उपस्थित राहिल्याबद्दल संयोजकांनी जाहीर अभिनंदन व आभार व्यक्त केला.


