Monday, May 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedविदर्भ राज्य आंदोलन समिती कडुन दिनांक १मे २०२६रोजी इंदिरा गांधी चौक गडचिरोली...

विदर्भ राज्य आंदोलन समिती कडुन दिनांक १मे २०२६रोजी इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे काळा दिवस पाळून धरणे आंदोलन..

विदर्भ राज्य आदोलन समिती जिल्हा गडचिरोली च्या वतीने विदर्भ राज्य झाले पाहिजे व गडचिरोली जिल्ह्यातील विविध गंभीर समस्या तात्काळ सोडवून गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी  दिनांक १मे २०२६ला इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे काळा दिवस पाळून धरणे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी अरुण मुनघाटे जिल्हा समन्वयक विदर्भ राज्य आंदोलन समिती, अशोक पोरेड्डीवार दक्षिण जिल्हाध्यक्ष , रमेश भुरसे शहराध्यक्ष, गोवर्धन चव्हाण, सुनील पोरेड्डीवार,विलास रापर्तिवार, गडचिरोली नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, माजी सभापती गुलाब मडावी,सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन चव्हाण, बाळकृष्ण सावसागडे, विदर्भ महामंचचे संयोजक गुरुदेव भोपये,जनार्दन साखरे, दिनकर लाकडे, हितेंद्र गेडाम, उमेश सरदार,रमेश शृंगारपवार तथा बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular