Monday, May 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेशातील पहिली डिजिटल जनगणना-2027; स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा...

देशातील पहिली डिजिटल जनगणना-2027; स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

*देशातील पहिली डिजिटल जनगणना-2027; स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

: भारतातील पहिली डिजिटल जनगणना म्हणून ओळखली जाणारी जनगणना-2027 ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक प्रक्रिया असून, यात स्वगनेच्या माध्यमातून सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे

जनगणना-2027 ही दोन टप्प्यांत पार पडणार असून, टप्पा 1 – घरयादी व घरगणना दि. 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत होणार आहे. त्यानंतर टप्पा 2 – लोकसंख्या गणना फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अचूक व विश्वसनीय माहिती संकलनावर भर दिला जाणार आहे.
यंदाच्या जनगणनेत प्रथमच स्व-गणना (Self Enumeration) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. ही सुविधा दि. 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. स्व-गणना पूर्ण केल्यानंतर मिळणारी Self Enumeration ID (SE ID) जतन करून ठेवणे आवश्यक असून, प्रगणक घरी आल्यावर ही ID त्यांना देणे बंधनकारक राहणार आहे.
शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी या स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना जनगणनेच्या कार्यात थेट सहभाग नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
जनगणनेतून मिळणारी आकडेवारी पुढील दहा वर्षांसाठी शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रेशन तसेच रोजगार योजनांच्या प्रभावी नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती नोंदवणे ही आपली जबाबदारी समजून सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित तहसील कार्यालय किंवा नगर परिषद/नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी जबाबदारी ओळखून जनगणना-2027 मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून जिल्ह्याची जनगणना यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular