Thursday, May 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्यापीठ आहे की इवेंटबाजीचे केंद्र याबाबतच्या वृत्ताचा खुलासा*

विद्यापीठ आहे की इवेंटबाजीचे केंद्र याबाबतच्या वृत्ताचा खुलासा*

*विद्यापीठ आहे की इवेंटबाजीचे केंद्र याबाबतच्या वृत्ताचा खुलासा*

 

गडचिरोली टाइम्स iदि.१३ /०५/२६

विद्यापीठ आहे की इवेंटबाजीचे केंद्र , प्रशासकीय दिरंगाई , रखडलेले विकास प्रकल्प या आशयचे गोंडवाना विद्यापीठाच्या विषयी वृत्त काही वर्तमानपत्रात प्रकाशीत झाले. सदर वृत्त पूर्णतःचुकीचे आणि निराधार आहे. करिता हा खुलासा सादर करीत आहोत.

गोंडवाना विद्यापीठ अस्तित्वात येऊन १४ वर्ष झाली आहेत. या १४ वर्षाच्या वाटचालीत अनेक यश विद्यापीठाने संपादित केले आहे. या छोट्या प्रवासात अनेक मानदंड निर्माण करीत पुढे जात विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात आपण विकसनशील असल्याच्या नोंदी केलेल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठाने विविध विद्यार्थी केंद्रित योजना सुरु केल्या असून त्याव्दारे या भागात अनेक बदल घडून आले आहे .

गोंडवाना विद्यापीठ हे विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास तसेच सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असून, विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज नियमितपणे सुरू आहे. विद्यापीठ परिसरातील पायाभूत सुविधा, वसतिगृह, मेस व्यवस्था, स्वच्छता व विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांबाबत बातमीत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. संबंधित बाबी प्रशासनाच्या निदर्शनास असून त्यावर टप्प्याटप्प्याने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत विद्यापीठाने मागील काळात विविध विकासकामे, डिजिटल सुविधा, संशोधन प्रोत्साहन, कौशल्यवर्धन उपक्रम, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषद, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले आहे. अशा उपक्रमांचा उद्देश केवळ ‘इव्हेंट’ आयोजित करणे नसून विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत, रोजगाराभिमुख व सर्वांगीण विकास साधने हा आहे .

 

*विद्यार्थी व समाजहितासाठी सुरू केलेले उपक्रम*

 विद्यापीठ सुरवातीला १० एकर जागेत उभे राहिले आणि विद्यमान स्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज १७ एकरच्या क्षेत्रफळात कार्यरत आहे. विद्यापीठाच्या भविष्यातील अनेक योजनांच्या व उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी १८० एकर जागा थेट पद्धतीने खरेदी करण्यात आली आहे.

 विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात ०५ पदव्युत्तर शिक्षण विभाग सुरु होते. त्यामध्ये वाढ करून १२ पदव्युत्तर विभाग सुरू आहेत. ज्यात उच्च शिक्षित , गुणवत्ता पूर्ण शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच निशुल्क स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रही कार्यान्वित केल आहे .

 कुठलाही विद्यार्थी आर्थिक विवंचने पासून प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विद्यापीठाने मोफत प्रवेश दिलाय सोबतच वसतिगृहातही राहण्याची मोफत सोय तसेच विर बाबुराव शेडमाके कमवा व शिका योजने योजनेअंतर्गत भोजनाची व्यवस्था विद्यापीठा मार्फत केली जाते अधिकचा खर्च झाल्यास फुड सबसिडी विद्यापीठावर कडून देण्यात येत आहे.

 यापूर्वी विद्यापीठात प्रयोगशाळा नव्हती. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षिकासाठी इतर महाविद्यालयांमध्ये जावे लागत होते. तीनवर्षापासून विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे. सोबतच संगणक लॅब देखील तयार करण्यात आलेली आहे.

 विद्यार्थी संख्या सतत वाढती असून २०२१-२०२२ मध्ये – २५० ते ३०० होती तर चालू शैक्षणिक वर्षात १०७६ विद्यार्थी प्रवेशीत आहेत.

 प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (MERU) अंतर्गत १०० कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी बांधकामासाठी जो निधी मंजूर झाला आहे त्यातून विद्यापीठ परिसर , अडपल्ली येथील परिसर विकास व प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह एजन्सी म्हणून पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग संबंधित नियुक्ती करण्याचा प्रस्ताव माननीय कुलपती कार्यालयाला पाठवण्यात आला आहे सदर प्रस्ताव प्रलंबित असून यासंबंधी वारंवार विद्यापीठ स्तरावर पाठपुरावा करणे सुरू आहे . तसेच विद्यापीठाच्या जुन्या प्रशासकी इमारतीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा या निधीतून घेण्यात आलेल्या आहेत. प्रयोगशाळेत अद्यावत साहित्यांची खरेदी करण्यात आलेली आहे.

 

 मॉडेल डिग्री कॉलेज अंतर्गत ‘विद्यापीठ आपल्या गावात’ या उपक्रमांतर्गत गोंडवाना विद्यापीठ परिसरातील शिक्षण अर्धवट सोडलेल्याना , पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना रोजगारासंदर्भात कौशल्य पूर्ण शिक्षण देण्यात येत आहे . हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यातील धनोरा तालुक्यातील जांभळी, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील बिबी या गावांतील एकूण 117 विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत बी.ए. पदवीसाठी प्रवेश घेतलेला आहे. फॉरेस्ट मॅनेजमेंट , डेटा सायन्स , ट्रायबल लॉ तसेच व्यसनाधीनतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘स्पार्क’ अभ्यासक्रम सर्च संस्था आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे.

 

 विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र ( STRC) ही एक प्रमुख संस्था आहे. स्थानिक संसाधनांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत रोजगार क्षमता वृध्दिंगत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.तसेच या केंद्राला ला “Centre of Excellence” मान्यता मिळाली आहे .

 विद्यापीठ स्थापनेच्या वेळी एकच छोटी दोन मजली इमारत होती. आज विद्यापीठाकडे जुनी प्रशासकिय इमारत, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, कुलगुरु निवास, परीक्षा भवन , एसटीआरसी ब्लॉक ,अतिथि कक्ष, उपहारगृह आणि दोन सांस्कृतिक सभागृह आहे. अजूनही पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु आहे.

 कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सी आय आय आय टी सेंटर सुरू करण्यात आले असून रोजगराभिमुख शिक्षण देण्यात येत आहे .

 वेब डेव्हलपमेंट, वेब डिझाईनिंग, वेब मॅनेजमेंट इत्यादी अभ्यासक्रम अल्फा अकॅडमी मार्फत सुरू आहे .

 ग्रामसभा सक्षमीकरणसाठी असलेल्या एकल प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत १२ तालुक्यात काम सुरू असून पेसा कायदा 1996, वन हक्क कायदा 2006, जैव विवधता कायदा 2002 व 2004, गौण वन उपज संकलन, संग्रहण व विपणन, वन व्यवस्थापन ,वन सरक्षण आराखडा तयार करणे. रोजगार हमी कायदा, ग्रामसभांचे रेकॉर्ड व अंकेषण तयार करणे इत्यादी कामांचे प्रशिक्षण देण्यात येते.

 नवउद्योजक घडविण्यासाठी विद्यापीठाचे ट्रायसेफ केंद्र, हे गोंडवाना विद्यापीठाचे कलम ८ अंतर्गत नोंदणीकृत नवउद्योजक कंपनी असुन २० मे २०२२ रोजी स्थापना करण्यात आलेली आहे. स्थापनेपासून आजपर्यंत केंद्रामार्फत एकुण ५६ प्रि-इन्क्युबेशन करार करण्यात आलेले असुन त्यामध्ये १७ LLP व २ Pvt. Ltd. अशा एकुण १९ कंपन्याचा समावेश आहे. तसेच आणखी ५ कंपन्याची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. सदर कंपनीमार्फत हस्तशिल्प, खाद्यान्य, वनोपषधी, कृषी, पर्यटन, ड्रोन सर्वेक्षण इत्यादी क्षेत्रआधारीत १०० हून अधिक उत्पाद तयार करण्यात आलेले आहेत. स्टार्टअप्सच्या विकास, प्रशिक्षण, मार्गदर्शन व विविध उपक्रमांसाठी आजपर्यंत एकुण रु. ६३,२७,८१७/- इतका खर्च करण्यात आलेला आहे.

 नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाअंतर्गत MRPS लघु संशोधन प्रकल्प आर्थिक सहाय्यता योजनेतंर्गत एकूण ५२ प्रकल्प असून सदर योजनेतंर्गत ४४,९४,०००/- पाठबळ विद्यापीठाकडून मंजुर करण्यात आलेले आहेत. अधिछात्र शिष्यवृत्ती (Doctoral Research Fellowship) व (Post-Doctoral Fellowship) योजनेतंर्गत १३ आचार्य संशोधक विद्यार्थ्यांना ९,४४, ४००/- आर्थिक सहाय्यता प्रदान करण्यात आलेली आहे. 1376,000%- गोंडवाना युनिवर्सिटी रिसर्च प्रमोशन व रिकग्नीशन पॉलिसी (GURPP) योजनेतंर्गत ०४ सहा. प्राध्यापक, यांना पुरस्कार व सदस्यत्व नोंदणी शुल्क रु. २६,६००/- प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य देण्यात आलेले आहे. Patent/Copyright/IPR निती अंतर्गत विद्यापीठाकडे एकूण २७ अर्जाची नोंद घेण्यात आलेली असून विद्यापीठाकडून आतापर्यंत प्राध्यापक/प्राध्यापिका यांना Patent/Copyright/IPR प्रकाशित करण्याकरीता रु. १,५१,६००/- आर्थिक सहाय्यतेचा लाभ देण्यात आलेला आहे.

 परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्याची परंपरा विद्यापीठाने कायम राखली आहे.यासाठी विद्यापिठाला लोकभवन कडून प्रशस्तीपत्र प्राप्त आहे. तसेच विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीबाबत ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सेंटरही २ मे २०२६ पासून सुरू करण्यात आले आहे .

 वीर बाबुराव कमवा शिका योजनेकरिता १५० लक्ष्याची तरतूद करण्यात आली आहे . तसेच विद्यार्थी सल्ला व सुविधा केंद्रांसाठी तरतूद करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी रु. ३३७ .०१ लक्ष निधी २०२६ -२०२७ च्या बजेट निश्चित करण्यात आला आहे .

 गोंडवाना विद्यापीठ व लॉयड्स मेटल्स यांचेमध्ये गडचिरोली येथील विद्यार्थ्यांना धातुशास्त्र, खाणकाम, कॉम्प्युटर सायन्स व अन्य विषयातील अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्यासाठी स्वायत्त ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ स्थापन करण्याबाबत करार करण्यात आला . या अनुषंगाने ५ जुलै २०२३ रोजी विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्यात आली . येथे ५२ विद्यार्थी प्रवेशितआहेत.

 विद्यापठाच्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पामुळे शेती उत्पादन, ग्रामीण रोजगार, उद्योग, मत्स्यव्यवसाय आणि जलसंधारण वाढून प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत आणि अप्रत्यक्षपणे GDP मध्ये वाढ होत आहे. गोसेखुर्द प्रकल्पामुळे सुमारे 1.96 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकरी एकपीक पद्धतीऐवजी दुहेरी व तिहेरी पीक घेत आहेत. सिंचनामुळे कृषी प्रक्रिया उद्योग, धान गिरण्या, दुग्धव्यवसाय वाढत आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि स्थानिक बाजारपेठ सक्रिय होते. सिंचनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून ग्रामीण विकासाला गती मिळत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून औद्योगिक वापरासाठी व पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यास मदत होते.

 पूर्व विदर्भातील शेतकरी पावसावर अवलंबून होते. आता कालवे आणि Lift Irrigation योजनांमुळे पाणी उपलब्ध होत आहे. शेतकरी फक्त धानावर अवलंबून न राहता भाजीपाला, फळबाग, डाळी आणि नगदी पिकांकडे शेतकरी वळत आहेत. यामुळे बाजारमूल्य आणि उत्पन्न वाढत आहे. पूर्वी खरीपपुरती मर्यादित शेती आता रब्बी व उन्हाळी हंगामातही सुरू झाली आहे. त्यामुळे शेतीतून वार्षिक उत्पन्न वाढत आहे. शेतकऱ्यांच्या सहभागातून पाणी व्यवस्थापन करण्यावर भर देत आहेत. पाणी वापर संस्था मजबूत करून न्याय्य पाणीवाटपाचा प्रयत्न सतत सुरू आहे. लाभक्षेत्रामध्ये ड्रिप व स्प्रिंकलर सिंचनामुळे पाण्याची बचत आणि उत्पादन वाढ साध्य होत आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्प शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे .

 

 

लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, पालक व समाजातील विविध घटकांकडून प्राप्त सूचना विद्यापीठ सकारात्मकतेने स्वीकारत असून, विधायक सहकार्याच्या माध्यमातून विद्यापीठ अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध आहे . अपूर्ण किवा एकांगी माहितीच्या आधारे विद्यापीठाची प्रतिमा मलिन, होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गोंडवाना विद्यापीठ हे केवळ शैक्षणिक संस्था नसून सामाजिक परिवर्तनाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांचे हित, गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण विकास या साठी गोंडवाना विद्यापीठ काम करीत आहे.

Previous article
श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी येथे जागतिक परिचारिका दिन कार्यक्रमात आरमोरी नगर परिषद चे नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, उपाध्यक्ष विलास पारधी,श्री साई स्कुल ऑफ नर्सिंग आरमोरीचे संचालक सुधाकरजी साळवे,आरमोरी प. स. माजी सभापती,चंदुजी वडपल्लीवर, सामाजिक कार्यकर्ते संजय कापकर प्राचार्या मृणालताई दर्वे, गेडाम ताई, राऊत ताई,समीर कांबळे,मान्यवर अतिथी,विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचेसह उपस्थित गडचिरोली नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे.*श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी येथे जागतिक परिचारिका दिन कार्यक्रमात आरमोरी नगर परिषद चे नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, उपाध्यक्ष विलास पारधी,सुधाकरजी साळवे,संजय कापकर प्राचार्या मृणाल दर्वे, समीर कांबळे मान्यवर अतिथी सह गडचिरोली नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे**श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी येथे जागतिक परिचारिका दिन कार्यक्रमात आरमोरी नगर परिषद चे नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, उपाध्यक्ष विलास पारधी,सुधाकरजी साळवे,संजय कापकर प्राचार्या मृणाल दर्वे, समीर कांबळे मान्यवर अतिथी सह गडचिरोली नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे*
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular