Friday, September 25, 2026
Google search engine

वैद्यकीय पदवी म्हणजे केवळ कागद नाही, समाजाच्या आरोग्याची हमी — आ. सुधीर मुनगंटीवार.         शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न…शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरचा दीक्षांत समारंभ आज सैनिकी विद्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. एमबीबीएस पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी विधिवत पदवीदान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील अभिमान या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. याप्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रेरणादायी आणि अनुभवसंपन्न असे भाषण करत विद्यार्थ्यांना समाजसेवेची दिशा दिली.

आपल्या भाषणात मुनगंटीवार म्हणाले की, आजचा दिवस प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे ही एक वेगळीच अनुभूती आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनुभव सांगताना नमूद केले की, “माझी मुलगी एमबीबीएस झाल्यावर मी पदवीदान समारंभाला गेलो होतो, त्या क्षणी जो आनंद झाला तो अवर्णनीय होता.तोच आनंद आज मी उपस्थित पालकांच्या चेहऱ्यावर अनुभवत आहे.

 

ते पुढे म्हणाले की, आज तुम्हाला मिळालेली पदवी ही केवळ कागदाचा तुकडा नाही, तर समाजातील आरोग्याची मोठी जबाबदारी आहे.आपल्या कुटुंबातील वैद्यकीय परंपरेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या परिवारात १३ डॉक्टर असून वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी १९६० साली एमबीबीएस पूर्ण केले. भाऊ नेत्ररोगतज्ञ, मुलगी व जावई रेडिओलॉजिस्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

स्वतः डॉक्टर होऊ न शकल्याची खंत व्यक्त करत त्यांनी सांगितले की, आणीबाणीच्या काळात वडील तुरुंगात असल्याने ते वैद्यकीय शिक्षण घेऊ शकले नाहीत. मात्र गोंडवाना विद्यापीठ यांनी मानद डॉक्टरेट देऊन त्यांना ‘डॉक्टर’ ही उपाधी दिल्याचा त्यांनी उल्लेख केला.

 

कुटुंबातील डॉक्टरांना गमतीने मी नेहमी म्हणतो, तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये जितके पेशंट तपासत नसाल, तितके मी आरोग्य शिबिरांमध्ये पाहतो. चंद्रपूरमध्ये मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आपण योगदान दिल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी सांगितले की, या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात नवी पिढी घडविण्याचा प्रयत्न केला आहे.

 

डॉक्टरांविषयी समाजातील श्रद्धा अधोरेखित करत ते म्हणाले की, डॉक्टर म्हणजे देवदूतच असतो.आज जरी स्पेशालिस्ट पद्धत रूढ असली तरी पूर्वी एकच डॉक्टर सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असत, त्यांचे वडील रात्री अपरात्री रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करत असत, अशी आठवण त्यांनी सांगितली.

 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांना सजग करताना सांगितले की, आज विज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या युगात स्वतःला सतत अपडेट ठेवणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही, पण तंत्रज्ञानाचा वापर करणारा डॉक्टर समाजाच्या निदान प्रक्रियेत मोठी प्रगती घडवू शकतो. टेलीमेडिसिन, रोबोटिक सर्जरी यांसारख्या नव्या संकल्पनांचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, नव्या आव्हानांचा स्वीकार करून संवेदनशील व कुशल डॉक्टर म्हणून स्वतःला सिद्ध करावे.

 

यावेळी त्यांनी काव्यात्मक शैलीत विद्यार्थ्यांना प्रेरणा देत म्हटले,

“नई डगर है, नया सफर है,

विज्ञान के साथ चलना होगा,

मशीनें तो बस जरिया है,

पेशंट की धड़कनों को सुनना होगा.”

 

या ओळींमधून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मानवी संवेदनांचा महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना “देवदूत” बनून समाजसेवेचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

 

याशिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सैनिकी विद्यालयाच्या सभागृहासमोरील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या ६२ अभ्यासक्रमांच्या केंद्राचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“चंद्रपूरचा ‘सी’ कायम ‘चॅम्पियनशिप’चाच असावा,” असे म्हणत जिल्ह्याच्या प्रगतीबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.

या कार्यक्रमाला पद्मश्री माजी खासदार डॉ. विकास महात्मे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. मंगेश गुलवाडे, उपअधिष्ठाता डॉ. शरद कुचेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

एकूणच, हा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण ठरला असून, समाजसेवेच्या दिशेने प्रेरणा देणारा सोहळा ठरला.

Previous article
गडचिरोलीतील विकास कामांच्या*गडचिरोलीतील विकास कामांच्या सर्व फाईल्स फास्टट्रॅकवर घ्या – मुख्य सचिव राजेश अग्रवाल* *वनहक्कधारक शेतकऱ्यांना तातडीने ‘फार्मर आयडी’ देण्याचे निर्देश* *प्रलंबित प्रस्ताव, अपूर्ण कामे व निधी वापरावर भर; योजनांना गती देण्याच्या सूचना* गडचिरोली, (जिमाका) दि. 17 : गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांशी संबंधित मंत्रालय स्तरावरील सर्व प्रलंबित फाईल्स फास्टट्रॅकवर घेऊन कामांना तातडीने गती देण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. याचबरोबर वनहक्कधारक शेतकऱ्यांना तातडीने ‘फार्मर आयडी’ उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी निर्देश दिले. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातून अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये महसूल , खनिकर्म, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा व आरोग्य विभाग आदी विविध विभागांकडून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचा समावेश होता. संबंधित विभागांनी या प्रस्तावांच्या पाठपुराव्यात गती आणावी, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. रिक्त पदांच्या विषयावर जिल्हा परिषद, बांधकाम, आरोग्य व इतर विभागांतील रिक्त पदे माहे मे अखेरपर्यंत जास्तीत जास्त भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वनजमिनीचे पट्टे मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने ‘फार्मर आयडी’ देऊन विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्ते व पुलांच्या कामांना समन्वयातून गती देण्याचे निर्देश देण्यात आले. जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामांना वेग देण्यावर भर देण्यात आला. यावेळी विविध केंद्र व राज्य योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी व ‘रेड फ्लॅग’ बाबींचाही आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) व प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील कमी प्रगती तसेच पीएम सूर्यघर योजनेतील अत्यल्प अंमलबजावणीबाबत मुख्य सचिवांनी गांभीर्याने लक्ष वेधले. निर्माणाधीन घरे प्राधान्याने पूर्ण करण्याचे सांगतानाच प्रलंबित घरकुल हप्त्यांसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही ते म्हणाले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश देत मुख्य सचिवांनी सर्व विभागांनी समन्वयाने व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी विकास कामांच्या पूर्ततेसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या विशेष दौऱ्यावर असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कामांची माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव कार्यालयातून विविध विभागांचे अपर मुख्य सचिव व सचिव दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते, तर जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. — सर्व फाईल्स फास्टट्रॅकवर घ्या – मुख्य सचिव राजेश अग्रवाल
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular