Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाईम्स दिनांक१८ सप्टेंबर:विश्वगौरव पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचे दिर्घायुषासाठी मार्कंडेश्वर चरणी...

गडचिरोली टाईम्स दिनांक१८ सप्टेंबर:विश्वगौरव पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचे दिर्घायुषासाठी मार्कंडेश्वर चरणी प्रार्थना मार्कंडेश्वर देवस्थान येथे जलाभिषेक करून ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे व भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती

विश्वगौरव पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचे दिर्घायुषासाठी मार्कंडेश्वर चरणी प्रार्थना
मार्कंडेश्वर देवस्थान येथे जलाभिषेक करून ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे व भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी उत्साहात शुभारंभ करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वात तसेच भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्कंडादेव येथील ऐतिहासिक मार्कंडेश्वर देवस्थानात जलाभिषेक व पूजा-अर्चा करून अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी भगवान मार्कंडेश्वर यांच्या चरणी विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. जलाभिषेक करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली. धार्मिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
‘सेवा संकल्प अभियान’ हे दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून सेवा, जनसहभाग आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.
या अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’, ‘स्वप्नांचा भारत’ चित्रकला व भाषण स्पर्धा, ‘नमो सेवा गाथा’ नाटक सादरीकरण, अंगणवाडी सेविका सन्मान, विकासकामांची रील स्पर्धा, सेवा दीप यात्रा, ‘सेवा व आपले योगदान’, सेवा सेतू अभियान, रांगोळी स्पर्धा, विकसित भारत संकल्प यात्रा, इनोव्हेशन चॅलेंज तसेच पवित्र जल संकलन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून शेतकरी, मजूर, युवक, महिला, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सरपंच अंगणवाडी सेविका, तसेच समाजातील विविध घटकांना सहभागी करून घेण्यात येणार असून सामाजिक सहभागाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विविध स्पर्धा व जनजागृतीपर कार्यक्रमांद्वारे विकसित भारताची संकल्पना, सामाजिक सेवा आणि राष्ट्रनिर्मितीतील नागरिकांचे योगदान याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ‘सेवा संकल्प अभियानाला’ प्रारंभ झाला असून आगामी महिनाभर विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभियानातील सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री भाजपा किसान मोर्चा साईनाथ बुरांडे, रामचंद्र वरवाडे, जयराम चलाख, राजू मोगरे, भरत धोडरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular