Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोली टाइम्स दि. ११ सप्टेंबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते '६२व्या महाराष्ट्र...

गडचिरोली टाइम्स दि. ११ सप्टेंबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘६२व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे’ वितरण विविध पुरस्कार प्राप्त मान्यवर :- 🏆 राणी मुखर्जी – स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2025 🏆 प्रसाद ओक – चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2025 🏆 सलीम खान यांच्यावतीने पत्नी हेलन खान – स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2025 🏆 पं. हृदयनाथ मंगेशकर – चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2025 यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मंत्री ॲड. आशिष शेलार, दिग्दर्शक किरण शांताराम व इतर मान्यवर उपस्थित…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘६२व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे’ वितरण
विविध पुरस्कार प्राप्त मान्यवर :-
🏆 राणी मुखर्जी – स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2025
🏆 प्रसाद ओक – चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2025
🏆 सलीम खान यांच्यावतीने पत्नी हेलन खान – स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2025
🏆 पं. हृदयनाथ मंगेशकर – चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2025
यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मंत्री ॲड. आशिष शेलार, दिग्दर्शक किरण शांताराम व इतर मान्यवर उपस्थित होते.
कलाक्षेत्रातील दिग्गजांचा गौरव, 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे दिमाखात वितरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्या’त प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2025, अभिनेते प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2025, ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2025 आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पं. हृदयनाथ मंगेशकर हे असे नाव आहे, ज्यांनी अखंड संगीताची सेवा केली. विशेषतः स्व. लतादीदी, स्व. आशाताईंसारख्या मोठ्या भगिनी असताना स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण करणे, आपले वेगळे विश्व तयार करणे, हे अत्यंत कठीण काम होते. ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ते साध्य केले. संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंग, ओव्या या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी अभिजात संगीत आपल्यापर्यंत पोहोचवले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आणि स्व. लतादीदी, स्व. आशाताईंचा आवाज म्हणजे स्वर्गाचा अनुभव लाभावा, अशा पद्धतीचे एक प्रकारचे मिश्रण पाहायला मिळाले. ‘शिवकल्याण राजा’ या संगीत अल्बमच्या माध्यमातून अजरामर कार्य पंडितजींनी केले. अशीच संगीताची सेवा पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी करत राहावी, त्यांना ईश्वराने दीर्घायुष्य द्यावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लेखक कशा पद्धतीने हिरो घडवतो, हे आपल्याला त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’च्या माध्यमातून पाहायला मिळाले. संपूर्ण चित्रपटसृष्टीला बदलण्याचे काम त्यांनी केले. ‘जंजीर’ चित्रपटातील आक्रोशित विजय असेल किंवा ‘दीवार’मधील संघर्षशील विजय असेल, अशी पात्रे साकारणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्या साथीने त्यांनी आपल्या लेखणीतून अजरामर ठसा उमटवला. ‘शोले’ चित्रपटातील संवाद आजही प्रसिद्ध आहेत. सलीम खान यांना उत्तम आरोग्य मिळावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.


अभिनेते प्रसाद ओक यांच्याकडे कलेच्या क्षेत्रात 360 डिग्री मॅन म्हणून पाहिले जाते. ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघे यांच्या भूमिकेत जीव ओतून त्यांनी काम केले. तर प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळा झंझावात आणला. विविध प्रकारच्या भूमिका साकारत त्यांनी स्त्रीकेंद्री भूमिकांमध्येही वास्तवता आणि प्रभावीपणा कशा पद्धतीने मांडता येतो, हे आपल्या अभिनयातून सिद्ध केले, असे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
मराठी चित्रपटांसाठी उत्तम सुविधा, तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी तसेच चित्रनगरी नव्या रूपात विकसित करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरु आहेत, असे सांगत मराठी चित्रपट आणि मराठी रंगभूमी सर्वोत्तम असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular