
गडचिरोली टाइम्स दि. १८ऑगष्ट:सामकी माता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोवर्धनजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…
महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असलेले हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त तिन्ही आश्रम शाळेच्या संयुक्त विद्यमाने रेखेगाव येथे संस्थापक अध्यक्ष गोवर्धन चव्हाण यांचा ६४ वा वाढदिवस ऊत्साहात साजरा करण्यात आला.

अध्यक्षस्थानी मा. गोवर्धन चव्हाण साहेब उपस्थित होते, विशेष अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव सो. गीताजी चव्हाण मॅडम उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रकाश ताकसांडे माजी उपनगराध्यक्ष नगरपरिषद गडचिरोली होते. तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्री. गोर्लावार सर, सो. गोर्लावार मॅडम, मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर, श्री. मांडोळे सर, श्री. धोती सर, प्रभारी मुख्याध्यापक तथा प्राचार्य नाकाडे सर उपस्थित होते.
सर्वप्रथम स्व. वसंतराव नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
त्यानंतर संस्था अध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षक श्री. गोर्लावार सर व यांच्या सहपत्नी शालेय शाल व श्रीफळ तसेच साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्ष महोदयांनी विद्यार्थ्यांना खोटे बोलू नये नेहमी खरे / सत्य बोलावे नेहमीत अभ्यास करावा आणि आपले स्वप्न साकार करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे श्री प्रकाश ताकसांडे सर यांनी विध्यार्थ्यांनी भरपूर पुस्तके वाचावीत आपल्या गुरुचा आदर करावा आणि भविष्यात मोठे व्यक्ती बनुन समाजसेवा करावी तसेच मा. चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अध्यक्ष साहेबांना वाढदिवसांच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींनी गाणे गाऊन तसे नृत्य करून चव्हाण साहेबांना शुभेच्छा देण्यात आल्या. मा. चव्हाण साहेबांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
संदीप येरकरी या विद्यार्थ्याचासुद्धा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रभारी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. नाकाडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्री किशोर वावरें तर आभार श्री राहुल बोबाटे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


