गडचिरोली टाइम्स दि. १५जुलै २०२६ :भाजप कार्यकर्ते काशिनाथ दुधबावरे यांच्या अपघाती निधनानंतर माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची सांत्वनपर भेट; कुटुंबाला आर्थिक मदत व दिला
धीर..गडचिरोली तालुक्यातील दर्शनी माल येथील भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते कै. काशिनाथ रामदास दुधबावरे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी दुःखी परिवाराला धीर देत आर्थिक मदतही प्रदान केली.मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ दुधबावरे हे तेलंगणातून रोवणीचे काम करून मजुरांसह आपल्या गावाकडे परत येत असताना दि. १३ जुलै रोजी दुपारी सुमारे २.०० वाजता गोंडपिपरीजवळील बेडगाव टर्निंग येथे त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात काशिनाथ दुधबावरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर वाहनातील अनेक मजूर गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच डॉ. अशोकजी नेते यांनी तत्काळ दर्शनी माल येथे जाऊन दिवंगत काशिनाथ दुधबावरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना मानसिक आधार दिला तसेच आर्थिक मदतही केली.यावेळी बोलताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे. या कठीण प्रसंगी आम्ही संपूर्ण दुधबावरे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे असीम दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.या सांत्वनपर भेटीदरम्यान किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास पा. भांडेकर, गडचिरोली भाजप तालुकाध्यक्ष दतुभाऊ सुत्रपवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चरणदास पिपरे, उमाजी पिपरे, सुधाकर वैरागडे, प्रवीण बारसागडे, नागेश उडाण यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दर्शनी माल येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


