गडचिरोली टाइम्स दि. २३ऑगष्ट : मार्कंडेश्वर देवस्थान, मार्कंडादेव येथे वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य महागंगा आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.श्री मार्कंडेश्वराच्या पावन भूमीत होणाऱ्या या मंगलमय सोहळ्यामुळे वैनगंगेचा तीर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, भाविकांना श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.महाआरतीच्या वेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
Oplus_16908288 मार्कंडेश्वर देवस्थान, मार्कंडादेव येथे वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य महागंगा आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.श्री मार्कंडेश्वराच्या पावन भूमीत होणाऱ्या या मंगलमय सोहळ्यामुळे वैनगंगेचा तीर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, भाविकांना श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.महाआरतीच्या वेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.Oplus_16908288या पवित्र सोहळ्यात वैनगंगा मातेची सामूहिक आरती करण्यात येणार असून, श्री मार्कंडेश्वराच्या चरणी श्रद्धा अर्पण करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.परिसरातील तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महागंगा आरती सोहळ्याचे साक्षीदार व्हावे आणि वैनगंगा मातेच्या आरतीत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री मार्कंडेश्वर देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संगम ठरणाऱ्या या भव्य सोहळ्याची भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.